शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं अन् थेट प्रायव्हेट पार्टवर वार; प्रेयसीने प्रियकरासोबत असं का केलं ?

| Updated on: Sep 20, 2023 | 4:20 PM

लग्न करण्यास नकार देणाऱ्या प्रियकराला प्रेयसीने जबर शिक्षा दिली. त्यानंतर तिने थेट पोलिस स्टेशन गाठलं आणि आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. तर या घटनेत जबर जखमी झालेल्या प्रियकाराची प्रकृती अजून नाजूक आहे.

शारीरिक संबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावलं अन् थेट प्रायव्हेट पार्टवर वार; प्रेयसीने प्रियकरासोबत असं का केलं ?
Follow us on

रांची | 20 सप्टेंबर 2023 : झारखंडमध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. तेथे एका महिलेने सर्वप्रथम तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर (cut private parts) ब्लेडने वार केले. या हल्ल्यात प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर ती स्वत:च पोलिसांकडे (surrender in police station) गेली आणि आपण प्रियकरावर हल्ला केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. तिची ही कबुली ऐकून पोलिसही हादरले. मात्र त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.

तिने असं का केलं ?

पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने कृत्याची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला विवाहीत आहे, मात्र भांडणामुळे ती पतीसोबत नव्हे तर एकटीच राहते. वर्षभरापूर्वी तिची गावातील सुशील टुडू याच्याशी ओळख झाली व हळूहळू त्यांचे एकमेकांवर प्रेम जडले. सुशीलने लग्नाचे वचन देऊन आपल्यासोबत अनेक वेळा शरीरसंबंध ठेवले, मात्र लग्नासाठी दबाव टाकल्यावर त्याने नकार दिला, असा आरोप त्या महिलेने लावला. यामुळे संतापलेल्या महिलेने सुशील याला धडा शिकवण्याचे ठरवले आणि  शरीरसंबंध ठेवण्याच्या बहाण्याने घरी बोलावून त्याच्या प्रायव्हेट पार्टवर थेट वार केला.

या घटनेनंतर आरोपी महिलेने स्वत: गिरिडीहमधील तारातंड पोलीस ठाणे गाठले आणि न्यायाची मागणी केली. तर दुसरीकडे या घटनेत जखमी झालेल्या पीडित तरुणाच्या कुटुंबीयांनीही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून महिलेची तुरूंगात रवानगी केली. आरोपी महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी पीडित तरुणाविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आणि तिचा प्रियकर दोघेही आधीपासूनच विवाहीत आहेत. त्यांना मुलंही आहेत. मात्र पीडित तरूण हा त्याच्या पत्नीपासून लपून-छपून आरोपी महिलेला भेटायला यायचा. तर आरोपी महिलाही पतीपासून वेगळी रहात होती. पीडित तरूणाने तिला लग्नाचे वचन दिले होते मात्र ते पाळले नाही, म्हणूनच रागाच्या भरात तिने हे कृत्य केले. घटनेनंतर महिला स्वत: पोलीस ठाण्यात आली आणि आत्मसमर्पण केले, तिने तिच्या प्रियकराविरोधात तक्रारही दाखल केली असे पोलिसांनी सांगितले. सध्या पोलिस दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.