चंदन पूजाधिकारी, नाशिक : बहुचर्चित ज्ञानदीप आधार आश्रम लैंगिक अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी हर्षल मोरे याला न्यायालयाने चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हर्षल मोरे हा द किंग फाउंडेशन संचालित ज्ञानदीप आधार आश्रमाचा संचालक आहे. मुलींना वेठबिगारी पासून ते लैंगिग अत्याचार केल्याचे त्याच्यावर आरोप आहे. सहा अल्पवयीन मुली आणि एका मुलीने हर्षल मोरे याच्या विरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरून त्याच्यावर म्हसरूळ पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 24 नोव्हेंबरला हर्षल मोरे याच्यावर पाहिला गुन्हा दाखल झाला आहोत. त्यानंतर हर्षल मोरेला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. मंगळवारी झालेल्या न्यायालयातील सुनावणीत संशयित आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माने नगर परिसरात द किंग फाउंडेशन संचालित ज्ञानदीप आधार आश्रमात लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती.
सुरुवातीला एका पीडित मुलीने तिच्या नातेवाईकांना अत्याचाराची बाब सांगितली होती, त्यानंतर हर्षल मोरे पाय दाबण्याच्या नावाखाली घेऊन जात लैंगिक अत्याचार करत असल्याची बाब समोर आली आहे.
त्यानंतर म्हसरूळ पोलीसांनी केलेल्या तपासात एकूण सात मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब समोर आली आहे, त्यातच त्यांच्याकडून जेवण झाल्यावर द्रोण बनवून घेण्याचेही तो काम करत होता.
याबाबत महिला बाल कल्याण विभागाने देखील दखल घेतली असून सात दिवसांच्या आत अहवाल मागितला आहे, तसे आदेश मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काढले होते.
14 दिवसांपासून पोलिस कस्टडीत असलेल्या हर्षल मोरेला आणखी तपास करण्यासाठी पोलीसांनी पोलीस कस्टडी मागितली होती. मात्र न्यायालयाने हर्षल मोरे याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
या घटनेने नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती, त्यावरून राज्यातील आधार आश्रमाचा मुद्दा देखील समोर आला असून परवानग्या आणि सुरक्षा असे महत्वाचे दोन मुद्दे समोर आले आहे.