Kalyan Theft : एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा अटक, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ठोकल्या बेड्या

| Updated on: Aug 12, 2022 | 9:09 PM

हा चोरटा देशभरात रेल्वे गाड्यांतून प्रवास करत महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारायचा. या आरोपीने केवळ कल्याणमध्ये 13 चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे.

Kalyan Theft : एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा अटक, सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी ठोकल्या बेड्या
एक्सप्रेसमध्ये महिलांच्या पर्सवर डल्ला मारणारा चोरटा अटक
Image Credit source: TV9
Follow us on

कल्याण : एक्सप्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधून पैसे आणि दागिने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे क्राईम ब्रांच (Railway Crime Branch) पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शहजाद सय्यद असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. हा चोरटा देशभरात रेल्वे गाड्यांतून प्रवास करत महिला प्रवाशांच्या पर्सवर डल्ला मारायचा. या आरोपीने केवळ कल्याणमध्ये 13 चोऱ्या केल्याचे उघड झाले आहे. रेल्वे स्टेशनवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासून पोलिसांनी संशयित व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली. यावेळी आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या ? चोरीचा माल कुठे विकला ? देशभरात कोणकोणत्या ठिकाणी चोऱ्या याबाबत पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.

एक्स्प्रेस गाडीतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधीव वस्तू चोरायचा

गेले काही दिवसांपासून एक्सप्रेसमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. विशेष म्हणजे मेल एक्सप्रेसगाड्यात महिला प्रवाशांच्या पर्समध्ये हात टाकून चोरटे मोठ्या शिताफीने महागड्या वस्तू आणि पैसे लंपास करायचा. रेल्वेमध्ये चोरीच्या तक्रारींमध्ये वाढ झाल्याने कल्याण रेल्वे क्राईम ब्रांचचे पोलिस आयुक्त कैसर खालीद यांही एक पथक तयार केले. या पथकात नेमलेले पोलिस अधिकारी पीएसआय प्रकाश चौगुले, शंकर परदेशी, पोलिस हवालदार रणजित रासकर, वैभव जाधव, अजित माने, अक्षय चव्हाण, गोरख सुरवसे, जनार्दन पुलेकर, राजेंद्र दिवटे या पथकाने कल्याण स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यास सुरुवात केली.

दरम्यान, या पथकाला कल्याण रेल्वे स्थानकात सीसीटीव्ही फूटेजमध्ये एक संशयित व्यक्ती नजरेत आला. काही दिवसांपूर्वी हा व्यक्ती स्टेशन परिसरात फिरत असताना दिसल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. चौकशीत त्याचे नाव शहजाद सय्यद असल्याचे सांगत त्याने देशभरात फिरून मेल एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्सवरवर डल्ला मारत असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे. (Kalyan Crime Branch arrested the thief who stole from the express)

हे सुद्धा वाचा