कल्याण – कल्याण पश्चिमेकडील (Kalyan west) अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास आग लागली होती. त्या आगीत आजी नातीचा मृत्यू झाल्याने परिसरात नागरिक हळहळ व्यक्त करीत आहेत. खातीजा हसम माइमकर (70) आणि इब्रा रौफ शेख (22) अशी मयत महिलांची नावे आहेत. शॉर्टसर्किटमुळे (fire short circuit) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस (kalyan police) व्यक्त केला. पोलिस आग कशामुळे लागली याचा शोध घेत आहेत. रात्री ही घटना घडल्यामुळे परिसराट घबराहट पसरली आहे.
कल्याण पश्चिमेकडील अण्णासाहेब वर्तक रोड परिसरातील घास बाजार येथील शफिक खाटी मिठी इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावरील घराला अचानक आग लागली. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली असून या भीषण आगीत घराचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. तर घरात झोपलेल्या 70 वर्षीय महिलेचा, आणि 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.
खातीजा हसम माइमकर (70) आणि इब्रा रौफ शेख (22) अशी मृत महिलांची नावे आहेत. आग लागल्याची माहिती मिळताचं अग्नीशमक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परंतु उपचारापुर्वीचं डॉक्टरांनी मृत घोषित केलं. मात्र या आगीत घराचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.
.