मुंबई : आपण अनेकदा कामच्या ओढीन घाईगडबडीने लोकल (Mumbai Local) पडकत असतो. मात्र काही वेळातच आपला मोबाईल (Mobile Phone) आपल्या खिशात नसल्याचे आपल्या लक्षात येते. कामाच्या वेळाची लोकलची गर्दी तर सगळ्यांनाच परिचित आहे. अशा गर्दीचा फायदा घेऊन काही चोर आपला आपला मोबाईल लंपास (Mobile Thief) करतात. अशाच एका चोराला पोलिसांना बेड्या ठोकल्या आहेत. याा चोराकडे तर जणू चोरलेल्या मोबाईलचा साठाच सापडला आहे. स्टेशन परिसरात झोपलेले प्रवासी आणि लोकल पकडताना होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचा मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्यात .बालाजी मस्सा असे या चोरट्याचे नाव असून त्याच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं आहे. या दोघांकडून 14 मोबाईल हस्तगत केले आहेत.
रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी रेल्वे मध्ये वाढलेल्या चोरी आणि लूटीच्या गुन्ह्याना आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते .या पार्श्वभूमीवर कल्याण रेल्वे क्राइम ब्रांच चोरीच्या गुन्ह्यांचे तपास करत होती .एका मोबाईल चोरीचा गुन्ह्याचा तपास करत असताना कल्याण ग्रामीण मधील कांबा परिसरात राहणारा बालाजी मस्से हा चोरटा पोलिसांच्या हाती लागला .त्याच्याकडून कल्याण रेल्वे पोलीस ठाणे अंतर्गत दाखल आठ गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून 11 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.त र बालाजी सोबत ताब्यात घेण्यात आलेल्या अल्पवयीन मुलाकडून 3 मोबाईल हसगत करण्यात आले. या दोघांकडून आतापर्यंत 14 महागडे मोबाईल हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे अधिकारी अर्षद शेख यांनी दिली . या दोघांकडून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून पुढील तपास सुरू आहे.
या दोघांना पकडल्यामुळे पोलिसांच्या या मोहिमेला चांगले यश प्राप्त झाले आहे. या मोहिमेतर्गंत आणखीही काही चोर पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस ही मोहीम आणकी काही दिवस सुरू ठेवण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मोबाईल चोरीच्याही अनेक घटना घडल्या होत्या. लोकलमध्ये मोबाईल चोरणाऱ्या चोरांचा सुळसुळाट उठला होता. या चोरट्यांना आळा घालण्यासाठी आणि या भागातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांकडून अशी मोहीम काढण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशात माणूसकीला काळीमा; अल्पवयीन मुलीवर 80 नराधमांचा तब्बल 8 महिने अत्याचार
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते मुंबई टू कोल्हापूर व्हाया सातारा! अजून कुठे कुठे गुन्हे दाखल?