कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर अमराठी माणसाने अमानुष हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या घटनेत एका परप्रांतीय कुटुंबाने बाहेरुन गुंड आणून कारण नसताना लोखंडी रॉडने मराठी कुटुंबाला मारहाण केली. या हल्ल्यामुळे एका तरुणाच्या डोक्यात तब्बल 10 टाके पडले. कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी रात्री हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. या घटनेप्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब अजूनही दडपणाखाली जगत आहे.
कल्याणमध्ये मराठी कुटुंबावर हल्ल्याप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत इमारतीच्या लिफ्टमधून सर्व आरोपी एकत्र येताना दिसत आहेत. तसेच यावेळी ते बेछूट मारहाण करत असल्याचेही पाहायला मिळत आहे. या व्हिडीओत अखिलेश शुक्लासोबत एक काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आणि दाढी वाढलेला व्यक्ती दिसत आहे. हा व्यक्ती देशमुख कुटुंबावर बेछूटपणे रॉडने मारहाण करत आहे. याप्रकरणी पोलिसांनी अखिलेश शुक्लाला अटक केली आहे. मात्र काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला आरोपी अद्याप फरार आहे. त्यामुळे देशमुख कुटुंब अजूनही भयभीत झाले आहे. या आरोपीला लवकरात लवकर पकडा, अशी विनंती देशमुख कुटुंबियांनी पोलिसांना केली आहे.
कल्याणमधील खडकपाडा परिसरात मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी अखिलेश शुक्लासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र शुक्लानंतर मारहाणीत सर्वात पुढे दिसणारा काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि वाढलेली दाढी असलेला आरोपी अद्याप फरार आहे. हा आरोपी अमानुषपणे मिळेल त्याला रोडने मारहाण करत आहे. हा आरोपी फरार असल्याने देशमुख कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अखिलेश शुक्ला, त्याची पत्नी गीता शुक्ला आणि अन्य चार आरोपींना अटक केली आहे. मात्र, मारहाणीचे मुख्य सूत्रधार असलेल्या काळ्या टी-शर्ट घातलेल्या आरोपीला पकडण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. आरोपीला लवकरात लवकर पकडा अशी विनंती देशमुख कुटुंबियांनी पोलिसांना केली आहे.
“सदर आरोपीने लोखंडी पाईपने आमच्यावर हल्ला केला. त्याने माझ्या भावाला गंभीर जखमी केले आहे. सध्या तो रुग्णालयात दाखल असून त्याची प्रकृती गंभीर आहे. मारहाणीचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. ज्यामध्ये आरोपी स्पष्ट दिसत आहे. हा आरोपी लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. आम्हाला सतत जीवाला धोका असल्याची जाणीव होते. हल्ल्याच्या वेळी अखिलेश शुक्ल्याच्या पत्नीने उपस्थितांना धमकी दिली होती की “सबको काट डालो.” त्यामुळे कुटुंब भयभीत आहे, असे देशमुख कुटुंबाने सांगितले. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांनी त्वरीत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. खडकपाडा पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू ठेवला असून फरार आरोपीला पकडण्यासाठी शोध सुरु आहे.