Kalyan Crime : दमून-भागून ती टॅक्सीतून घराकडे निघाली होती, सुनसान रस्ता येताच जे घडलं.. त्याला अखेर अटक

| Updated on: Oct 17, 2023 | 4:56 PM

या घटनेनंतर कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपीचा कसून शोध घेत त्याला बेड्या ठोकत अटक केली.

Kalyan Crime : दमून-भागून ती टॅक्सीतून घराकडे निघाली होती, सुनसान रस्ता येताच जे घडलं.. त्याला अखेर अटक
Image Credit source: TV9 Network
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 17 ऑक्टोबर 2023 : मुंबई शहरात महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये वाढ (crime in city) होताना दिसत आहे. दिवसेंदिवस शहर असुरक्षित बनत चाललं आहे. कधी गर्दीचा फायदा घेऊन कोणी छेड काढतं, तर कधी बस-ट्रेनमध्ये प्रवास करताना ‘नको तो’ स्पर्श सहन करावा लागतो. रात्रीच्या वेळे रिक्षा, टॅक्सीतूनही जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो.

चालत्या कॅबमध्ये एका तरूणीचा विनयभंग (crime news) झाल्याची घटना उघडकीस आल्यावर संपूर्ण शहर हादरलं होतं. अखेर याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे. कल्याण कोळसाडी पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या नराधमाला बेड्या ठोकल्या. राकेश जयस्वाल असे आरोपीचे नाव असून त्याला नवी मुंबईतील ऐरोली येथून अटक करण्यात आली.

नेमकं काय झालं ?

नवी मुंबई परिसरामधील एका कंपनीमध्ये काम करणारी तरुणी तीन दिवसांपूर्वी काम आटपूर रात्रीच्या सुमारासा घरी जात होती. कल्याण येथे जाण्यासाठी तिने कॅब बूक केली. प्रवास सुरू झाल्यावर काही वेळ सगंळ ठीक होतं. मात्र थोड्या वेळाने सूनसान रस्ता आल्यानंतर कॅब चालकाने अचानक हालचाल करत पीडित तरूणीचा विनयभंग केला. यामुळे ती अतिशय भेदरली होती. मात्र आजूबाजूला कोणीच नसल्याने ती गप्प राहिली.

थोड्या वेळाने कॅब मुख्य रस्त्यावर आल्यावर त्या तरूणीने अचानक आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. ते ऐकताच कॅब चालकाने तिला सूचक नाका येथे कॅबमधून खाली उतरवले आणि तो तेथून फरार झाला. पीडित तरूणी कशीबशी घरी पोहोचली. घरी आल्यावर कुटुंबियांना तिने सर्व प्रकार सांगितला. घरच्यांनी धीर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो पोलिसांकडे गेली आणि घडलेली सगळी घटना सांगितली. याप्रकरणी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कल्याण कोळसवाडी पोलिसांनी विविध टीम बनवल्या आणि पीडित तरूणीलोबत हे कृत्य करणाऱ्या कॅब चालकाचा कसून शोध सुरू केला. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारो पोलिसांच्या एका पथकाने नवी मुंबईतील नेरूळ येथे राकेश जयस्वाल या आरोपी कॅब चालकाला अटक केली. सध्या तो पोलिसांच्या ताब्यात असून त्याने यापूर्वीही असा गुन्हा केला आहे का, आणखी कोणत्याही महिलेसोबत असे कृत्य केले आहे का याचा शोध कल्याण कोळसेवाडी पोलीस घेत आहेत.