Kalyan Crime : निलंबित केल्याच्या रागातून माजी कुलगुरूंना मारहाण, शिक्षकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

| Updated on: Nov 21, 2023 | 10:52 AM

सहा वर्षांपूर्वी निलंबित केल्याचा राग मनात धरून माजी कुलगुरूंना मारहाण करण्यात आली आहे. शिक्षकासह पाच जणांनी मिळून माजी कुलगुरूंना बेदम मारहाण केली. कल्याण शहरात ही अतिशय धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.

Kalyan Crime : निलंबित केल्याच्या रागातून माजी कुलगुरूंना मारहाण, शिक्षकासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Follow us on

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 21 नोव्हेंबर 2023 : सहा वर्षांपूर्वी निलंबित केल्याचा राग मनात धरून माजी कुलगुरूंना मारहाण करण्यात आली आहे. शिक्षकासह पाच जणांनी मिळून माजी कुलगुरूंना बेदम मारहाण केली. कल्याण शहरात ही अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

सहा वर्षांपूर्वी निलंबित केल्याचा राग मनात धरून नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू यान्हा छत्रपती शिक्षण मंडळातील एका निलंबित शिक्षकाने आपल्या चार साथीदारासह बेदम मारहाण केली. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. निलंबित शिक्षकाने मनात राग ठेवून, अतिशय योजनाबद्ध रितीने हल्ला करत मारहाण केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक प्रधान हे मुंबईतील रुपारेल महाविद्यालयाचे प्राचार्य, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू, कल्याण जनता बँकेचे विश्वस्त, कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष होते. ते गेल्या अनेक वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील कर्णिक रस्त्यावरील प्रधान बंगल्यात राहत आहेत. सहा वर्षांपूर्वी त्यांनी छत्रपती शिक्षण मंडळातील शिक्षक संजय भगवंत जाधव याला निलंबित केले होते.

मात्र जाधव यांच्या मनात या घटनेमुळे प्रचंज राग होता. तोच राग मनात ठेवून रविवारी, १९ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास संजय जाधव हा त्याचया चार मित्रांसह कल्याणात गेला. तेथून ते सगळे 84 वर्षीय माजी कुलगुरू अशोक प्रधान यांच्या घरी पोहोचले आणि त्यांनी आत घुसून प्रधान यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात प्रधान हे जबर जखमी झाले. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्यांनी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत या मारहाणीप्रकरणी तक्रा नोंदवली. निलंबित शिक्षक संजय भागवंत जाधव (५०, रा. शिवम टॉवर, खडेगोळवली, कल्याण पूर्व), संदेश नामदेव जाधव (३२, रा. सरस्वती कॉलनी, आनंदवाडी, विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व), दोन अनोळखी पुरूष आणि एक महिला यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. त्याआधारे महात्मा फुले पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. प्रधान यांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.