कानपूर | 1 नोव्हेंबर 2023 : अवघ्या १० व्या इयत्तेत शिकणाऱ्या एका अल्पवयीम मुलाच्या निर्घृण हत्येमुळे शहर हादरलं आहे. शहरातील कापड व्यापारी मनिष कनेडिया यांच्या अल्पवयीन मुलाच्या हत्येमुळे फक्त कुटुंबच नव्हे तर शहरातही शोककळा पसरली आहे. मात्र आता त्याच्या हत्येमागे नेमक कारण काय, याचा पोलिस कसून शोध घेत आहेत. या हत्येप्रकरणी लव्ह ट्रँगलचा अँगल असल्याची माहिती समोर येत याहे.
ज्या शिक्षिकेकडे तो २ वर्षांपूर्वी शिकवणीसाठी जायचा, तिच्याशीच कुशाग्रचे प्रेमसंबंध असल्याचे बोलले जात आहे. त्याच्या हत्येत त्या शिक्षिकेचाही सहभाग होता. कुशाग्रच्या हत्येची योजना शिक्षकेच्या प्रियकराने तयार केली होती. आपली प्रेयसी आणि कुशाग्र यांच्यात जवळीक असल्याचा संशय येत होता. प्रेमात अडथळा येत असल्यानेच त्याने प्रेयसी आणि मित्रासह मिळून कुशाग्रची हत्या केल्याचे समोर आले.
या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी प्रभात, शिक्षक रचित वत्स आणि शिवा यांना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानपूरचे कापड व्यापारी मनीष कनोडिया यांचा मुलगा कुशाग्र कनोडियाच्या हत्येतील मुख्य आरोपी प्रभातने सांगितले की, त्याचे रचित वत्ससोबत प्रेमसंबंध आहेत. रचित मुलांची शिकवणी घ्यायची. २ वर्षांपूर्वी कुशाग्र हा रचितकडे ट्यूशनसाठी यायचा, पण नंतर काही काळाने त्याने ट्यूशनासाठी येणं बंद केलं. मात्र असं असलं तरीही रचित आणि कुशाग्र हे एकमेकांना भेटायचे. त्या दोघांचे अफेअर होते, असा संशय प्रभातला आला आणि तो ही गोष्ट सहन करू शकला नाही. आपल्या आणि रचितच्या प्रेमाच्या मार्गातून हटवण्यासाठीच त्याने प्लान आखला.
असा रचला हत्येचा कट
कुशाग्र दररोज दुपारी ४ वाजता कोचिंगसाठी स्वरूप नगर येथे जातो हे प्रभातला माहीत होते. त्याचवेळी त्याने कुशाग्रचा काटा काढण्याचा प्लान रचला. घटनेच्या दिवशी प्रभात कुशाग्राची वाट पाहत जरीब चौकीजवळ उभा होता. कुशाग्र त्यांच्या स्कूटीवरून कोचिंगसाठी जात होता. आधीच प्लान आखल्यानुसार, प्रभातने कुशाग्रला थांबवले. काहीतरी सबब सांगत त्याने घरी जाण्यासाठी कुशाग्रकडे लिफ्ट मागितली. कुशाग्र हा प्रभातला आधीपासूनट ओळखत होता, त्यामुळे त्याने त्याला स्कूटीवर लिफ्ट दिली. घराजवळ पोहोचल्यानंतर प्रभातने त्याला कोल्डड्रिंक पिण्याच्या बोलावले आणि घराजवळच्याच एका रिकाम्या खोलीत घेऊन गेला.
आतमध्ये गेल्यावर प्रभातने जवळच असलेली दोरी घेऊन कुशाग्रचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच ठेवण्यात आला. मात्र हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, पण तोपर्यंत आरोपी कुशाग्रच्या मृतदेहाची विल्हेवाट लावू शकले नाहीत. त्यांनी मृतदेह त्याच खोलीत ठेवला.
संशय येऊ नये म्हणून रचला खंडणीचा ड्रामा
कुशाग्रला मारल्यानंतर, कोणीही त्यांच्यावर संशय घेऊ नये, म्हणून प्रभातने त्याच्या अपहरणाचा बनाव करण्याचा करण्याचा दुसरा डाव रचला. आरोपी प्रभातने कुशाग्रच्या घरी पत्र पाठवून खंडणीची मागणी केली होती. आम्हाला तुमचा सण खराब करायचा नाही आणि कोणतेही नुकसान करायचे नाही, असेही पत्रात लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी कुटुंबाकडे 30 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणीसाठीच कुशाग्रचे अपहरण झाले असाव, असे लोकाना या पत्राद्वारे वाटेल असा प्रभातला संशय होता.
Kanpur case businessmans son lost life in love triangle teacher boyfriend killed him
पोलिसांकडे तक्रार येताच त्यांनी याप्रकरणाच तपास सुरू केला आणि ते ॲक्शन मोडमध्ये आले. पोलिसांनी एक पथक तयार करून संपूर्ण घटनेचा तपास सुरू केला. कुशाग्र ज्या ठिकाणी जायचा त्या ठिकाणांचे सीसीटीव्ही फुटेजपोलिसांनी गोळा केले. कुशाग्र कनोडिया यांच्या अपार्टमेंटमध्ये तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाचीही पोलिसांनी चौकशी केली. अखेर तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपींना शोधून काढत मुसक्या आवळल्या.