कानपूरमध्ये शोभिता नावाच्या एका महिलेच्या मृत्यूबाबत गूढ (Shobhita Death Mystery) निर्माण झालंय. या महिलेनं आत्महत्या (Married Women Suicide) करण्याआधी आत्महत्येची तयारी करताना लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड (Suicide LIVE Video) केला. हा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा तिचा पतीच होता, अशी खळबळजनक माहिती समोर आलीय. धक्कादायक बाब म्हणजे पंख्यावर फास लावणं, बेडवर खुर्ची ठेवून आत्महत्येची तयारी करणं, अशी घटना कॅमेऱ्यात कैद झाली. पण हा व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर दोन तासांनी शोभिताचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. आत्महत्येची तयारी आणि मृत्यूमधील दोन तासांचा गॅप अनेक प्रश्न उपस्तित करणारा ठरलाय.
दोन तासांनी शोभिताचा पती संजीव यांने त्याच्या सासू सासऱ्यांना फोन केला. शोभिताचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर शोभिताच्या आई-वडिलांनीही तिच्या घरी धाव घेतली. त्यावेळी संजीव शोभिताची छाती दाबत होता. तिला तोंडावाटे श्वास देऊन पुन्हा जिवंत करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
संजीव शोभिताला वाचवण्याचा प्रयत्न करतोय की नाटक करतोय, याची पडताळणी करण्याची ती वेळच नव्हती. समोर दिसत असलेलं चित्र पाहून सासू सासऱ्यांनाही काय झालंय, ते कळेनासं झालं.
जावई संजीवसह शोभिताच्या आईवडिलांनी तिला रुग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत्यू घोषित केलं. अद्याप शोभिताच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. सध्या पोलिसांना पोस्ट मॉर्टेम रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
पण या सगळ्या प्रकरणात पोलीस सक्रिय झाले. त्यांना या प्रकरणी शंका येऊ लागली. अशातच शोभिता आत्महत्येची तयारी करत असतानाचा लाईव्ह व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आणि एकच खळबळ उडाली.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या व्हिडीओमध्ये शोभिता कॅमेऱ्यासोबत आत्महत्येची तयारी करताना दिसते. आत्महत्येची रिहर्सल केल्यासारखा हा व्हिडीओ होता. या व्हिडीओत ती खूर्ची पलंगावर ठेवते. पंख्याला फास बांधते. कॅमेऱ्याच्या मागे असलेल्या व्यक्तीला उत्तरही देते.
हा व्हिडीओ पाहून पोलिसही हादरले. त्यांनी पती संजीवला तातडीने ताब्यात घेतलं. पत्नीला तडफडताना पाहून पती संजीवने तिचा जीव तेव्हाच का वाचवला नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. चौकशी सुरु झाली.
हा व्हिडीओ 25 ऑकोट्बर 2022चा असल्याचं चौकशीतून समोर आलं. कानपूरच्या गुलमोहर पार्कमधील राहत्या घरातच संजीव आणि शोभिताने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता. तेव्हा घडाळ्यात दुपारचे 12.30 वाजले होते.
पण शोभिताचा मृत्यू झाल्याचं कळल्यानंतर तिचे आई-वडील जेव्हा तिच्या घरी पोहोचले, तेव्हा दुपारचे 2.30 वाजले होते. तेव्हा पती संजीव हा तर शोभिताचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करताना तिच्या आईवडिलांना दिसला होता.
या दोन तासांच्या गॅपने संभ्रम अधिक वाढवला. शोभिताने आत्महत्या केली, की संजीवने तिची हत्या केली, की शोभिताला तडफडून मरताना संजीवला पाहात राहायचं होतं, असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत.
पंख्याला लटकलेला फास, पलंगावरची खुर्ची, पलंगावरच निपचित पडलेली शोभिता आणि तिचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणारा संजीव या चित्राने शोभिताच्या मृत्यूचं गूढ वाढवलंय.
फेब्रुवारी 2017 रोजी शोभिता आणि संजीवचं लग्न झालं होतं. लग्नाच्या पाच वर्षांत त्यांच्या अनेकदा वाद झाले होते. पण आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलावं, असं तिला अचानक का वाटलं, की तिची हत्याच करण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे.