नवी दिल्लीः नोकरी देतो असं सांगून अपहरण करून नंतर शारीरिकदृष्ट्या अपंग करणाऱ्या आणि मोठ्या शहरांमध्ये भीक मागायला लावणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या टोळीतील महिलेसह एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दुसऱ्या महिलेला आणि एकाच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
कानपूरच्या नौबस्ता भागात सुरेश मांझीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली आहे. मात्र, आरोपींना अटक केल्या नंतर सुरेश मांझी यांच्या कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
दिल्लीमधील मचारिया येथील रहिवासी सुरेश मांझी यांचे हातपाय तोडून भीक मागण्याचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली.
मच्छीमारांकडे काम देण्याच्या बहाण्याने सुरेशला मांझीने सोबत घेऊन गेला होता. यानंतर त्याला तेथे ओलीस ठेवण्यात आले होते. त्यानंतर मात्र विजयने सुरेशच्या डोळ्यात केमिकल टाकून त्याचे डोळे फोडले होते.
त्यामुळे त्यांची दृष्टीच गेली होती. त्यानंतर मात्र, नवी दिल्लीतील नागलोई येथे भीक मागणाऱ्या टोळीचा प्रमुख राज नगरला 70 हजार रुपयांना त्याला विकण्यात आले.
डीसीपी दक्षिण प्रमोद कुमार यांनी सांगितले की, टोळीचे सदस्य कामाच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना काम देण्याच्या बहाण्याने रेल्वे, बस स्थानक आणि मोठ्या शहरांच्या गजबजलेल्या बाजारपेठांमध्ये आणलेल्या लोकांना अपंग बनवून त्यांना भिकारी बनवण्यात आले होते.
त्यातून दिवसाची त्यांची कमाई ही दीड ते दोन हजार रुपये होते. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर मात्र टोळीचा म्होरक्या राज नागर आणि त्याच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांच्या टोळीतील 2 सदस्यांचा पोलीस शोध घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भीक मागण्यासाठी लोकांना अपंग करायचे, त्यांचे अपहरण करुन त्यांना अपंग करायचे अशी मोठी टोळी दिल्लीत कार्यरत असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.
राज आणि त्याची आई ज्या प्रमाणे हे काम करत होते, ते काम अनेक जण करत आहे, त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.