तुमकुर : कर्नाटकात झालेल्या भीषण बस अपघातात (Bus Accident) आठ जणांना प्राण गमवावे लागले, तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात (Tumkur Karnataka) पावगडजवळ खासगी बस उलटून अपघात झाला होता. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला. अपघातानंतर काही प्रवासी बसमध्येच अडकून पडले होते. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली, असे प्राथमिक तपासात दिसून येत असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. अपघात झाला त्यावेळी बसमध्ये 60 प्रवासी होते.
Karnataka | Eight dead and more than 20 critically injured including students as a bus overturned near Pavagada in Tumkur district: Tumkur Police
Further details awaited. pic.twitter.com/9fNqWD1r6T
— ANI (@ANI) March 19, 2022
कर्नाटकात झालेल्या भीषण बस अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला, तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. कर्नाटकातील तुमकुर जिल्ह्यात पावगडजवळ खासगी बस उलटून शनिवारी सकाळी अपघात झाला.
अपघातानंतर काही प्रवासी उलटलेल्या बसमध्येच अडकून पडले होते. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ती उलटली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
अपघाताच्या वेळी बस प्रवाशांनी खचाखच भरलेली होती. प्रत्यक्षदर्शींच्या दाव्यानुसार बसमध्ये जवळपास साठ जण असल्याचा अंदाज आहे. त्यामध्ये मुख्यत्वे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
20 जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
गंगापूर-वैजापूर रोडवर भीषण अपघात, 3 जण जागेवरच ठार
पेट्रोल पंपावरून निघाले अन् भरधाव टेम्पोखाली सापडले, लातूर जिल्ह्यात भीषण अपघात, दोन ठार, एक जखमी