बंगळुरु : बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या (Bajrang Dal activist Murder) झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील शिमोगामध्ये (Shivamogga) रविवारी रात्री हा प्रकार घडला. हर्षा असे हत्या झालेल्या 26 वर्षीय कार्यकर्त्याचे नाव आहे. चाकूने सपासप वार करुन हर्षावर हल्ला करण्यात आला. बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या झाल्यामुळे सध्या शिमोगामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हर्षा गेल्या अनेक वर्षांपासून बजरंग दलाचा कार्यकर्ता होता. या हत्येनंतर शिमोगा जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिजाब विरोधी पोस्ट (Hijab) केल्यामुळे त्याची हत्या झाल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. दरम्यान, शिमोगा शहरातील सीगेहट्टी परिसरात अनेक वाहने जाळण्यात आली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
Karnataka | A 26-year-old Bajrang Dal activist Harsha was allegedly murdered yesterday at around 9 pm in Shivamogga. Security heightened in the city.
— ANI (@ANI) February 20, 2022
कर्नाटक सध्या हिजाब वादाचे केंद्रबिंदू ठरला आहे. शिमोगा येथे सातत्याने आंदोलनं होत आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून काही काळ कलम 144 ही लागू करण्यात आले होते. अशा स्थितीत शिमोगा येथील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. त्यातच थेट बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या खुनामुळे हा तणाव आणखी वाढला आहे.
बजरंग दलाच्या 26 वर्षीय कार्यकर्त्याची रविवारी संध्याकाळी चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. हल्ल्यानंतर लगेचच त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्येनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अद्याप या प्रकरणाबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. ही हत्या कोणत्या कारणासाठी करण्यात आली, हा हल्ला कोणी केला, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अस्पष्ट आहेत.
कर्नाटकात हिजाबवरुन वाद सुरु झाल्यापासून बजरंग दलाने सक्रिय भूमिका बजावली आहे. अशा स्थितीत या हत्येनंतर उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. काही जण या हत्येला हिजाबच्या वादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांनी अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. या हल्ल्याबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही.
हिजाब वादावर कर्नाटक उच्च न्यायालयात 14 फेब्रुवारीपासून नियमित सुनावणी सुरु आहे. आज पुन्हा तोच मुद्दा न्यायालयात चर्चेला येणार आहे. जानेवारी महिन्यात हिजाबमुळे 6 विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये प्रवेश नाकारल्याने हा वाद आणखी वाढला. त्या एका घटनेनंतर इतर महाविद्यालये आणि शाळांमध्ये निदर्शने सुरू झाली आणि लवकरच कर्नाटक हिजाबच्या वादाचे केंद्र बनले.
संबंधित बातम्या :
वैनगंगा नदीत अंघोळीला गेला अन् बुडून मेला, चंद्रपूरमध्ये तरुणाचा मृत्यू
नागपुरात उच्चशिक्षित युवतीकडून दुचाकींची चोरी, अशी फसली पोलिसांच्या जाळ्यात
टिटवाळ्यावरुन वाशीला जीव द्यायला आला! नोकरी नसल्यानं पुलावरुन उडीही टाकली आणि…