Lawrence Bishnoi : आता नंबर लॉरेन्सचा, त्याचा एन्काऊंटर करणाऱ्याला 1 कोटी देणार.. चवताळलेल्या या संघटनेच्या घोषणेने गॅंगवॉर भडकणार?

| Updated on: Oct 22, 2024 | 9:20 AM

Lawrence Bishnoi : कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या खूप चर्चेत आहे. त्यातच आता त्याचं एन्काऊंटर करणाऱ्या व्यक्तीला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. पण कोणी केली ही घोषणा ? त्यामागचं कारण तरी काय ?

Lawrence Bishnoi : आता नंबर लॉरेन्सचा, त्याचा एन्काऊंटर करणाऱ्याला 1 कोटी देणार.. चवताळलेल्या या संघटनेच्या घोषणेने गॅंगवॉर भडकणार?
लॉरेन्स बिश्नोईचं एन्काऊंटर करणाऱ्याला 1 कोटीचं बक्षीस
Image Credit source: social media
Follow us on

कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती जेलमध्ये कैद असला तरी संपूर्ण देशभरातच त्याची प्रचंड चर्चा सुरू आहे. मोठे राजकारणी, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर तर त्याच्या नावाची चर्चा थांबतच नाहीये. लॉरेन्सच्या शूटर्सनीच सिद्दीकी यांची हत्या केल्याचे सांगत या एका सोशल मीडिया पोस्टमधून या हत्याकांडाची जबाबदारी स्वीकारण्यात आली होती. लॉरेन्स आणि अभिनेता सलमान खानचं वैर तर जगजाहीर आहे. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानलाही मोठा धक्का बसला असून त्याचा सुरक्षेत कैक पटीने वाढ करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सगळीकडे सध्या लॉरेन्सच्याच नावाची चर्चा होताना दिसत आहे.

याचदरम्यान आता क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्सविरोधात मोर्चा उघडला आहे. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसाला 1 कोटीचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली आहे. क्षत्रिय करणी सेनेचे अध्यक्ष डॉ राज शेखावत यांनी ही घोषणा केली असून जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचं एन्काऊंटर करेल त्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. एका दिवसापूर्वीच राज शेखावत यांनी बडोदा येथे लॉरेन्स बिश्नोईच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. सुखदेव सिंग गोगामेडी हत्या प्रकरणातही लॉरेन्सचे नाव समोर आले होते, असे शेखावत म्हणाले होते. , लॉरेन्स आणि त्यांच्यासारख्या गुंडांनी संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे शेखावत यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले राज शेखावत ?

क्षत्रिय करणी सेनेच राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एका व्हिडीओद्वारे बिश्नोईच्या एन्काऊंटरवर बक्षिसाची घोषणा केली होती. लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला 1 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपये दिले जातील. शहीद सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या लॉरेन्स बिश्नोईद्वारे करण्यात आली होती. जो पोलीस अधिकारी लॉरेन्स बिश्नोईचे एन्काऊंटर करेल त्याला करणी सेना ही 1 कोटींची रक्कम देईल, असे राज शेखावत यांनी या व्हिडीमध्ये नमूद केले. एवढेच नव्हे तर त्या शूर पोलिसाच्या कुटुंबाची सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्था करणे ही आमची जबाबदारी असेल, असेही त्यांनी नमूद केले.

बाबा सिद्दीकी हत्याकांडातही आलं नाव

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा गुजरातच्या साबरमती तुरुंगात बऱ्याच दिवसांपासून कैद आहे. दसऱ्याच्या दिवशी, 12 ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी, फेसबुक पोस्टमध्ये, लॉरेन्स गँगने हत्येची जबाबदारी स्वीकारली. मुंबई क्राइम ब्रँचची 15 पथके या हत्येचा तपास करत असून आत्तापर्यत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खानची सुरक्षा हाय अलर्टवर आहे. मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या व्हॉट्सॲप मेसेजवरही सलमान खानला धमक्या आल्या आहेत.

5 डिसेंबर 2023 रोजी जयपूरमध्ये करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. काही तासांनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बिष्णोईची बलाढ्य गुन्हेगारी टोळी संपूर्ण देशात सक्रिय आहे. सप्टेंबर 2023 मध्ये या टोळीने खलिस्तानी समर्थक सुखा दुनाके यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.या सगळ्यात आता क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोई विरोधात उडी घेतली असून नवे गँगर भडकण्याची शक्यता आहे.