मुंबई : केदार दिघे (Kedar Dighe) यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात आलं. पीडित महिलेला धमकवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात समन्स बजावण्यात आलंय. शिवसेनेचे नवनियुक्त ठाणे जिल्हाप्रमुख (Thane District Head) केदार दिघे यांच्यावर एन. एम. जोशी मार्ग पोलीस (N. M. Joshi Police) ठाण्यात बलात्कार पीडितेला धमकावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणातला मुख्य आरोपी रोहित कपूर आहे. त्याचा शोध पोलीस करत आहेत. या प्रकरणी केदार दिघे यांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स पाठविलं आहे. परंतु, या समन्सवर ठराविक दिवसाची तारीख टाकण्यात आली नाही. लवकरात लवकर हजर राहा, असं सांगण्यात आलंय.
या प्रकरणात रोहित कपुर हा मुख्य आरोपी आहे. बलात्कार पीडितेनं तक्रार दिली. त्यानुसार, रोहित कपूर आणि केदार दिघे यांनी जीवे मारण्याची धमकी दिली, असा जबाब नोंदविला होता. कपूर आणि दिघे या दोघांवरही एन. एम जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलायं. केदार दिघे यांना समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावण्यात आलंय. त्यामुळं केदार दिघे हे पोलीस ठाण्यात चौकशीला केव्हा हजर राहतात, हे पाहणं महत्त्वाच राहणार आहे.
या प्रकरणी रोहित कपूरवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मूळ बलात्काराचा गुन्हा हा रोहित कपूरनं केला होता. याची वाच्यता कुठंही करू नये. किंवा पोलिसांत तक्रार होऊ नये, याप्रकरणी केदार दिघे यांनी बलात्कार पीडितेला धमकवल्याची तक्रार बलात्कार पीडितेनं केली आहे. तिने दिलेल्या तक्रारीनुसार, रोहित कपूर याने 28 जुलै रोजी लोअर परळच्या सेंट रेजिस या हॉटेलमध्ये एका कर्मचारी तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडितेला धनादेश देण्यासाठी हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित युवतीनं तक्रार करू नये, म्हणून तिला धमकविल्याचं तक्रारीत म्हटलंय. पोलिसांनी दिघेविरोधात धमकी तर रोहित कपुरविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केलाय.