बायको-मुलासह बाईकवरून फिरायला गेला, पतंगाच्या मांज्याने गळाच कापला, वसईमध्ये काय घडलं ?

| Updated on: Jan 13, 2025 | 8:44 AM

मकरसंक्रांतीचा सण उत्साहाने साजरा केला जातो, पण पतंगांच्या मांज्यामुळे होणारे अपघात चिंतेचा विषय आहेत. वसई आणि नाशिक येथील घटनांमध्ये मांज्याने गळा चिरल्याने गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे

बायको-मुलासह बाईकवरून फिरायला गेला, पतंगाच्या मांज्याने गळाच कापला, वसईमध्ये काय घडलं ?
पतंगाच्या मांज्याने दुखापत
Follow us on

मकरसंक्रातीचा सण फक्त महाराष्ट्रातच नव्हे देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तिळगुळाचे लाडू आणि पतंग.. ही सणाची दोन खास वैशिष्ट्य आणि सर्वांनाच आवडणारी. पंतग उडवण्याचा आनंद लहनांपासून मोठ्यापर्यंत अनेक लोक घेतात. पण त्याचा पतंगाचा मांजा हा काहींसाठी प्राणघातकही ठरू शकतो. मांज्याने हात कापला, तर कधी रस्त्यावरून जाताना मांज्यामुळे गळा कापून लोक जखमी झाल्याच्या अनेक घटना आपण दरवर्षी ऐकतच असतो. यंदाही मकरसंक्रात सुरू होण्यापूर्वी पासूनच लोकांमध्ये पतंग उडवण्याचा उत्साह दिस आहे. मात्र याच पतंगाच्या मांज्यामुळे अनेक दुर्घटनाही होताता दिसत आहेत.

पतंगाच्या मांज्याने एका इसमाचा गळा चिरल्याची धक्कादायक घटना वसईत घडली आहे. रविवार असल्याने आपला दहा वर्षाचा मुलगा आणि पत्नीसह बाईकवरुन फिरण्यासाठी जात असताना, एका पतंगाचा मांजा गळ्यात अडकला आणि गळ्यावर खोल जखम झाली. त्याला 9 टाके पडले आहेत. सुदैवाने बाईकवरून पडून वगैरे जास्त मोठी दुर्घटना झाली नाही, मात्र तरीही गळ्या टाके पडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मिळालेल्या वसईच्या समर्थ रामदास नगर येथे राहणारे विक्रम डांगे हे काल रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी त्यांची पत्नी नितल आणि दहा वर्षाचा मुलगा प्रांशू यांच्यासह बाईकने वसईच्या मधुबन परिसरातून फेरफटका मारत होते. त्याचवेळी संध्याकाळी 5.30 च्या दरम्यान मधुबनच्या एका मोकळ्या मैदानात सुरक्षा स्मार्ट सिटी मार्फत पंतग महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. विक्रम डांगे हे कुटुंबासह बाईकवरून जात असतानाच एका पतंगाचा मांजा त्यांच्या गळ्याभोवती आवळला गेला आणि गळ्यावर चिर पडली. चिर एवढी खोल होती की, बराच रक्तस्त्राव झालं, त्यांच्या गळ्याला 9 टाके पडले आहेत. पत्नीने लागलीच मांजा काढल्याने तसेच विक्रम यांचा बाईकचा स्पीड कमी असल्याने मोठी हानी झाली नाही.

पतंगासाठी नायलॉन मांजा वापरला तर गुन्हा दाखल करणार, संभाजीनगर शहर पोलिसांचा इशारा

मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरू नये, म्हणून पोलिसांच्या वतीने शहरात ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत नायलॉन मांजामुळे सुमारे 20 जण जखमी झाले आहेत. नायलॉन मांजा वापरणारे आणि विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला यावेळी दिला आहे. आतापर्यंत 50जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 6 जणांवर कलम 110अंतर्गत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे.

पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा चिनी मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन 

पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा प्लास्टिक किंवा सिंथेटिक पदार्थापासून तयार केलेला चिनी मांजा किंवा चिनी दोरा किंवा नायलॉन किंवा प्लास्टिक कृत्रिम मांजा हा माणसांसाठी तसेच पक्ष्यांना घातक ठरतो. त्यामुळे या मांजाच्या वापरावर ठाणे महापालिका क्षेत्रात प्रतिबंध करण्यात आला आहे. महापालिका क्षेत्रात त्याअनुषंगाने सर्व प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 450 आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडे चिनी मांजा आढळला नाही. मात्र, या तपासणीत एकल वापराचे सुमारे 290 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. तसेच, 13 लाख रुपयांचा दंड करण्यात आला.

पतंग उडवण्यासाठी तीक्ष्ण धातू किंवा काच घटक किंवा चिकट पदार्थ तसेच धागा मजबूत करणारा पदार्थ नसलेला केवळ सुती धागा वापरण्यास परवानगी आहे.

नाशिकमध्येही तरुणाच्या गळ्याला पडले तब्बल 75 टाके

काही दिवसांपूर्वी अशीच घटना नाशिकमध्ये घडली होती. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका 25 वर्षीय तरुणाला गंभीर दुखापत झाली. नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल 75 टाके पडले. नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या 25 वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली. या घटनेत मुशरन सय्यदचा गळा चिरला गेल्याने त्याच्या गळ्याला 75 टाके पडले. त्याच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मुशरन सय्यद हा 25 वर्षीय तरुण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून परत आला. या नायलॉन मांजामुळे त्याच्या गळ्यापासून ते आतमध्ये असलेली मुख्य रक्तस्त्राव करणारी वाहिनीला चीर पडली. मात्र तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्याला आयुष्य मिळालं.