कोल्हापूर: लग्नाला विरोध केल्यानं मुलीच्या आईलाच संपवल्याची धक्कादायक घटना आजरा तालुक्यातील आल्याचीवाडी येथे घडली आहे. याघटनेत मृत झालेल्या महिलेचं नाव लता परीट असं आहे. तर, आजरा पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु असल्याची माहिती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातल्या आल्याचीवाडी इथं घटना धक्कादायक घटना घडली आहे. लता परीट या शेतात कामासाठी गेल्या असता तिथं त्यांचा खून करण्यात आला आहे. आजरा पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र फिरवत आरोपी गुरुप्रसाद माडभगत याला अटक केली असून तपास सुरु आहे. लता परीट यांचा मृतदेह शवविच्छेदन करुन पोलिसांनी संबंधित महिलेच्या ताब्यात दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
आजरा पोलिसांनी आरोपी गुरुप्रसाद माडभगत याच्याकडं चौकशी केली असता त्यानं परीट यांनी त्यांच्या मुलीसाठी लग्नाचा दिलेला प्रस्ताव नाकारल्याने माडभगत यांनं हल्ला केला. माडभगत यानं लता परीट यांचा खुरप्यानं हल्ला करुन खून केल्याचं समोर आलं आहे. आजरा पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध ससून हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 3 महिन्याच्या मुलीला नर्सच्या वेशभूषेत आलेल्या महिलेने वॉर्डातून पळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 22 वर्षीय महिला आणि तिची तीन महिन्याची मुलगी अनेक दिवसापासून ससून रुग्णालयात उपचार होते घेत होते.
नर्सच्या वेषात येऊन बाळाळा पळवलं
सव्वीस वर्षीय महिला आणि तिच्या पतीने तीन महिन्याच्या मुलीला पळविल्याने रुग्णालयात एखच खळबळ निर्माण झाली आहे. सविस्तर माहिती अशी की, नर्सचा ड्रेस घालून 26 वर्षीय महिला ससून रुग्णालयात शिरली. संधी साधत तिने वॉर्डात प्रवेश मिळवला. अन् बाळाच्या आईचं दुर्लक्ष होताच तिने डाव साधला. काही मिनिटांत तिने बाळाला घेऊन तिथून पोबारा केला.
आपलं बाळ आपल्या शेजारी होतं आणि आता नाहीय या कल्पनेने बाळाच्या आईने हंबरडा फोडला. आईच्या हंबरड्याने वॉर्डात उपचार घेत असलेल्या रुग्णांना देखील गलबलून आलं. यावेळी रुग्णालयात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला.
आरोपी पती पत्नीला अपत्य होत नसल्यामुळे ससूनमधील तीन महिन्याचं बाळ पळविल्याची प्राथमिक माहिती आहे. परंतु रुग्णालयात चक्क नर्सच्या वेशभूषेत येऊन बाळ पळविल्याने ससूनची सुरक्षा यंत्रणा एवढी गहाळ कशी असू शकते, असा संतप्त सवाल पुणेकर विचारत आहेत.
इतर बातम्या:
कोल्हापूरसह राज्यातील सर्व पाटबंधारे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणार; जयंत पाटलांची ग्वाही
Kolhapur Ajara Guruparasad Madbhagat Murdered Lata Parit for opposing Marriage proposal of her daughter