कोल्हापूर: महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीरपणे गुटख्याची वाहतूक सुरु असल्याचं उघडकीस आलं आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी बेकायदा गुटखा वाहतूक प्रकरणी एका टेम्पोवर कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा गुटका व सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आले. या प्रकरणी दोन व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Kolhapur LCB seized nineteen lakh rupees gutakha case registered)
कोल्हूपरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 19 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शनिवार (27 फेब्रुवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. सांगली कोल्हापूर बायपास मार्गावरील उदगाव गावच्या हद्दीत हॉटेल क्रश समोरील रस्त्यावर हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक रामचंद्र शामराव कोळी यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली आहे.
विविध कंपन्यांचा गुटखा जप्त
जयसिंगपूर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, राज्यात गुटखा बंदी असताना बेकायदेशीररित्या टेम्पो मधून विविध कंपन्यांच्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. बेळगावहून विमल कंपनीचा पान मसाला ,वर्ल्ड कंपनीची सुगंधी तंबाखू ,आर एम डी पानमसाला घेऊन जात असलेला टेम्पो पकडण्यात आला. गुटख्याची टेम्पोतून वाहतूक सुरु असताना ही कारवाई झाली.
संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून उदय दत्तात्रय माने (53) रा-उमळवाड, तालुका शिरोळ जि. कोल्हापूर व स्वामी रा. अथणी, जिल्हा बेळगांव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यराज घुले,पोलीस हेडकॉन्स्टेबल अमोल कोळेकर ,अजय वाडेकर, संजय पडवळ, अर्जुन बंद्रे, संदीप कुंभार ,संतोष पाटील ,सागर परब आदींनी केली.
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शहापूर येथील डॉ. विवेक बन्ने याच्यावर हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला आणि त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, मोबाईल असा हजारो रुपयांचा ऐवज हिसकावून पसार झाले .याप्रकरणी विद्यमान नगरसेवकाचा मुलगा नितीन तानाजी हराळे व जावाईसह चौघांविरोधात शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे. हे चौघेही पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, मोठ्या निर्णय होणार? https://t.co/60Mm2dHN7g @SanjayDRathods @OfficeofUT @ShivSena @Dev_Fadnavis @ChitraKWagh @BhatkhalkarA #SanjayRathod #poojachavhan #UddhavThackeray #poojachavhan #Suicidecase
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2021
संबंधित बातम्या:
नागपूरकरांनो सावधान! सायबर गुन्ह्यांमध्ये 2019 च्या तुलनेत 75 टक्क्यांनी वाढ
(Kolhapur LCB seized nineteen lakh rupees gutakha case registered)