Video: बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात 13 जखमी, पाहा व्हिडीओ चालत्या व्हॅनवर हल्ला

| Updated on: Dec 27, 2022 | 1:06 PM

Video: चालत्या व्हॅनवर बिबट्याचा हल्ला, दोन गाड्यांनी मारला जागीचं ब्रेक, नाहीतर...

Video: बिबट्याचा धुमाकूळ, हल्ल्यात 13 जखमी, पाहा व्हिडीओ चालत्या व्हॅनवर हल्ला
leopard attack on car
Image Credit source: twitter
Follow us on

आसाम : काही लोकांना प्राण्यांचे व्हिडीओ (Animal Video) पाहायला अधिक आवडतात. काहीवेळा प्राण्यांचे चांगले व्हिडीओ पाहायला मिळतात. तर काहीवेळेला प्राण्याचे लोकांच्यावरती हल्ले केल्याचे व्हिडीओ असतात. बिबट्याचे (leopard) व्हिडीओ मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) अधिक पाहायला मिळत आहे. मानवी वस्तीत घुसून अनेकांवरती हल्ला केल्याच्या घटना मागच्या कित्येक दिवसात उजेडात आल्या आहेत.

आसाम राज्यातील जोरहाट परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत 13 जणांना जखमी केले आहे. त्यामध्ये दोन वनरक्षक अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. त्या बिबट्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हे सुद्धा वाचा

नेमकं व्हिडीओत काय आहे ?

बिबट्या एका इमारतीच्या गेटवरुन उडी घेऊन थेट लोकांच्या हल्ला करीत असल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यावरुन दोन गाड्या जात आहेत. त्यावेळी बिबट्या अचानक एका व्हॅनवर हल्ला करण्याच्या हेतूने उडी घेतो. त्यावेळी दोन्ही गाड्यांनी जागीचं ब्रेक मारला, नाहीतर बिबट्याचा आणि दोन्ही गाड्यांचा अपघात झाला असता.

विशेष म्हणजे बिबट्याने ज्या व्हॅनवरती झेप घेतली, त्या व्हॅनच्या काचा बंद असल्यामुळे कुणालाही इजा झाली नसल्याचं स्पष्ट दिसतं आहे. त्याचबरोबर गाडीच्या दरवाज्याच्यावरचा बाजूचा एक पार्ट हल्ल्यात निघून पडला आहे.

कोणत्याही मानवावरती हल्ला करु शकत नसल्याचे लक्षात आल्यानंतर बिबट्याने तिथून पळ काढला आहे. तो ज्या दिशेने जात आहे. त्या दिशेने त्याच्या मागून एक गाडी जात आहे.