मध्य प्रदेश : जबलपूरमध्ये एका दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीला तरुणाने भोसकलं. तरुणाने या विद्यार्थीनीला प्रपोज केलं होतं. हे प्रपोज नाकारल्यानं तरुणीवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तरुणीला भोसकून तरुण घटनास्थळावरुन फरार झाला. या घटनेत जखमी झालेल्या तरुणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती आता स्थिर असल्याचं कळतंय.
ज्या ठिकाणी ही घटना घडली, तेथील एका कॉलनीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा धक्कादायक प्रकार कैद झालाय. पोलिसांनी अल्पवयीन तरुणाला चाकू हल्ला केल्याप्रकरणी अटक केली आहे. तर त्याच्या साथीदाराचाही शोध पोलीस घेत असून पुढील तपास केला जातोय. ही घटना जबलपूरच्या घमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील द्वारका नगर इथं घडली.
पोलिसांनी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 7 डिसेंब रोजी घडली. दुपारच्या सुमारास दहावीतील मुलगी कोचिंग क्लासला जात होती. त्यावेळी दोघे जण एक्टीव्हा स्कूटीवरुन आले. तिच्यासोबत गैरव्यवहार करणाऱ्या या तरुणांना तिने हटकलं. तिथून निघून जात असताना एका तरुणाने तिचा पाठलाग गेला आणि नंतर तिला प्रपोज केलं.
तरुणाने घातलेली प्रेमाची मागणी विद्यार्थीनीने नाकारली. तेव्हा संतापलेल्या तरुणाने चाकू काढला आणि तिला भोसकलं. यात तरुणी गंभीर जखमी झाली. यानंतर एक्टीव्हा वरुनच तरुण आपल्या साथीदारासह पळून निघून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
या चाकूहल्ल्यामध्ये तरुणी जखमी झाली. रक्ताच्या थारोळ्यात ती पजली होती. पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थीनीची चौकशी केली असून तिचा जबाबही नोंदवून घेतला आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जातोय. या हल्ल्याप्रकरणी एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मात्र हल्लेखोर अजूनही फरार असल्याचं कळतंय.