’19 वर्षांनी मोठा असलेला पती गोळ्या खातो आणि मग माझ्याशी…’ पत्नीचा सनसनाटी आरोप

| Updated on: Nov 30, 2022 | 2:08 PM

'त्या' प्रकाराचा त्रास होऊन पत्नीची पतीविरोधात अखेर पोलिस स्थानकात धाव! काय नेमका आरोप?

19 वर्षांनी मोठा असलेला पती गोळ्या खातो आणि मग माझ्याशी... पत्नीचा सनसनाटी आरोप
धक्कादायक...
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मध्य प्रदेश : इंदूरमध्ये पोलीस जनसुनावणीदरम्यान एक अजब घटना समोर आली. एका महिलेनं तिच्या पतीवर सनसनाटी आरोप केले. पीडित महिलेचा पती तिच्यापेक्षा तब्बल 19 वर्षांनी वयाने मोठा आहे. पीडितेनं केलेल्या आरोपांनुसार लग्नानंतर तिचा पती गोळ्या खाऊन तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होता. यामुळे पीडितेला वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागलं असल्याचा आरोप करण्यात आलाय. विशेष म्हणजे गेल्या 3 वर्षांपासून पीडित महिला पतीपासून वेगळी राहते. आता तर या पीडितेच्या 12 वर्षांच्या मुलालाही तिचा पती सोबत घेऊन गेलाय. शिवाय तिला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचे प्रकारही घडत असल्याचं तिने तक्रारीत म्हटलंय.

पीडितेनं केलेल्या तक्रारीत, तिने पतीवर शंकाही उपस्थित केलीय. पतीचे इतरही काही महिलांशी संबंध असल्याची भीती पीडितेला असल्याचं तिने म्हटलंय. यासाठी पीडितेनं एक फेक आयडी बनवला आणि आपल्याच पतीसोबत ती अश्लिल चॅटिंग करु लागली. तेव्हा तिची शंका खात्रीत बदलीत.

फेक अकाऊंटवरुन पाळत

या दरम्यान, पीडितेचा पती या फेक अकाऊंट बनवलेल्या आयडीसोबत अश्लिल संवादासोबतच हस्तमैथून करतानाचेही व्हिडीओही पाठवत असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर या महिलेचा आपल्या पतीवरील विश्वासच उडाला. आपल्या पतीचे इतरही महिलांशी अनैतिक संबंध असू शकतात, अशी दाट शंका तिच्या मनात निर्माण झाली होती.

हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी सखोल तपास करु, असं म्हणत पीडितेला आश्वस्त केलं आहे. तसंच पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपी पतीवर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी जनसुनावणीवेळी म्हटलं. महत्त्वाचं म्हणजे पीडितेचा पती नागपूर येथील एअरपोर्ट एविएशन विभागात कामाला आहे. कुटुंबीयांनी लग्न लावून दिल्यामुळे पीडिता बराच काळ पतीचा छळही सहन करत होती, असं चौकशीतून समोर आलंय.

गेल्या 3 वर्षांपासून पीडिता आपल्या पतीपासून वेगळी राहत असून तिने आता घटस्फोटासाठी देखील अर्ज केला आहे. पीडितेच्या पतीने तिच्या 12 वर्षांच्या मुलाशीही ताटातूट केली आहे. पतीचं चारीत्र्य आणि त्याने केलेली वागणूक यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी तिने केली आहे. आता हे प्रकरण पोलीस जनसुनावणीत प्रलंबित असून पुढील कारवाई लवकरच केली जाण्याची शक्यताय.