भोपाळ : मध्य प्रदेशात SUV कारचा भीषण अपघात (Car Accident) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बाईक चालकाला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना हा अपघात झाला. यावेळी कार विरुद्ध दिशेला जाऊन पलटली. अवघ्या पाच सेकंदाच्या काळात ही गाडी तब्बल सात वेळा पलटी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) धार जिल्ह्यातील अंबाडा गावाजवळ हा अंगावर थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण अपघाताची दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV Camera) कैद झाली आहेत.
मध्य प्रदेशात SUV कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. समोरुन येणाऱ्या बाईकला वाचवण्याच्या नादात हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार विरुद्ध दिशेला जाऊन पलटली.
पाच सेकंदाच्या काळात ही गाडी तब्बल सात वेळा पलटी झाल्याचं व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या भीषण अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला.
मध्य प्रदेशात धार जिल्ह्यातील अंबाडा गावाजवळ हा अंगावर थरकाप उडवणारा अपघात झाला. या भीषण अपघाताची दृश्यं परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहेत.
CCTV | मध्य प्रदेशात कारचा भीषण अपघात, बाईकला वाचवण्याच्या प्रयत्नात गाडी सात वेळा पलटी #MadhyaPradesh | #SUV | #Car | #Accident | #Bike | #CCTV pic.twitter.com/QOeO9BB0yA
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 28, 2022
संबंधित बातम्या :
CCTV | कारचालकाची अक्षम्य हलगर्जी, खेळणारा दोन वर्षांचा चिमुरडा गाडीखाली आला, आणि…
वाशिम : अमरावती महामार्गावर भीषण अपघात; अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू
Ambarnath Accident | स्टेअरिंग लॉक झाल्यानं लोकनगरी एमआयडीसी रोडवर अपघात