पतीसोबत भांडण, चार मुलांसोबत विहीरीत उडी घेतली, नंतर अख्ख गाव ढसाढसा रडलं

| Updated on: Mar 27, 2023 | 12:46 PM

ही घटना घडल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी तीन मृतदेह विहीरीतून बाहेर काढले.

पतीसोबत भांडण, चार मुलांसोबत विहीरीत उडी घेतली, नंतर अख्ख गाव ढसाढसा रडलं
police station
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : पतीसोबत वाद झाल्यानंतर पत्नीने रागाच्या भरात आपल्या चार मुलांसोबत विहीरीत उडी घेतली. त्यानंतर ती महिला कशीबशी एका मुलीला घेऊन बाहेर निघाल्याची माहिती एका बेवसाईटने दिली आहे. त्याचबरोबर तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. पती आणि पत्नी (Husband and wife quarrel) एका कामावरुन वाद झाला, दोघांच्यातला वाद इतक्या टोकाला गेला की, पत्नीने रागाच्या भरात थेट विहीरीत उडी घेतली. हे प्रकरण मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) असून या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुराहनपूर जिल्ह्यातील खकनार पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टीका बर्डी फालिया या गावातील रमेश आणि त्याची पत्नी प्रमिला यांच्यात जोराचं भांडण झालं. हे भांडण काल रविवारी सायंकाळच्या सुमारास झालं आहे. त्यानंतर प्रमिलाने रागाच्या भरात चार मुलांसोबत विहीरीत उडी घेतली. त्यामध्ये तीन मुलांचा मृत्यू झाला, तर एका मुलाला घेऊन प्रमिला बाहेर आली. ज्यावेळी प्रमिला विहीरीतून बाहेर आली त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. दोन मुलं आणि दोन मुली यांना घेऊन प्रमीला यांनी विहीरीत उडी घेतली होती.

ही घटना घडल्याची माहिती समजल्यानंतर पोलिस अधिक्षकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ही घटना समजल्यानंतर पोलिसांनी तीन मृतदेह विहीरीतून बाहेर काढले. त्याचबरोबर ते मृतदेह जवळच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी संपुर्ण गावात या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

हे सुद्धा वाचा

गावकऱ्यांनी दिलेली माहिती, रमेशने त्यांच्या पत्नीला सायंकाळी शेतात कामाला जायचं असं सांगितलं होतं. त्यामुळे पत्नी आणि पती यांच्यात जोराचं भांडण झालं. त्यानंतर रागाच्या भरात पत्नीने चार मुलांसोबत विहिरीत उडी घेतली.