Mahadev App | सौरभ चंद्राकर याचा मुंबईत होता मोठा प्लान… ईडीचा मोठा दावा काय ?

| Updated on: Oct 13, 2023 | 9:24 AM

Mahadev App |महादेव ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर आणि त्याच्या साथीदारांची सध्या ईडकडून कसून चौकशी सुरू आहे. चंद्राकर आणि त्याच्या साथीदारांनी देशभरात विविध ठिकाणी संपत्ती गुंतवत मालमत्ता विकत घेतल्याचे समोर आले आहे. मुंबईतील त्यांच्या प्लानिंगबद्दलही माहिती मिळाली आहे.

Mahadev App |  सौरभ चंद्राकर याचा मुंबईत होता मोठा प्लान... ईडीचा मोठा दावा काय ?
Follow us on

मुंबई | 13 ऑक्टोबर 2023 : महादेव ॲपची (Mahadev app) सध्या बरीच चर्चा सुरू आहे. या ॲपचा प्रमोटर आणि त्याचे साथीदार यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींची ईडीकडून (ED) चौकशी सुरू आहे. प्रसिद्ध सिनेताऱ्यांच्या नावांमुळे सर्वसामान्यांचे लक्षही या केसकडे वेधले आहे. या ॲपचा प्रमोटर सौरभ चंद्राकर (saurabh chandrakar) याची सध्या ईडीकडून सखोल चौकशी सुरू आहे. त्यामध्ये रोज, अनेक नवनवे खुलासे होताना दिसत आहेत.

सौरभ चंद्राकरने त्याच्या साथीदारांसह कोट्यवधींची संपत्ती जमवली असून त्याच पैशांतून त्याने विविध ठिकाणी मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. तसेच मुंबईजवळ 5-स्टार हॉटेल आणि रिसॉर्ट बांधण्याची त्याची योजना होती, अशी माहितीही चौकशीतू मिळाली आहे. चंद्राकर हा बऱ्याच काळापासून मुंबईतील एका प्रख्यात ब्रोकरच्या संपर्कात होता, तो त्याला शहराजवळील प्रमुख मालमत्ता दाखवत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्राकर हा त्याचे 5-स्टार हॉटेल आणि विविध सुविधांनी युक्त असे रिसॉर्ट विकसित करण्यासाठी मुंबईजवळ एक मोठी जमीन घेण्याचा विचार करत होता.

मध्यप्रदेशमध्येही कोट्यवधींची मालमत्ता

याशिवाय, चंद्राकर आणि त्याचा सहकारी रवी उप्पल यांनी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये कोट्यवधींची मालमत्ता खरेदी केल्याचेही ईडीला समजले आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी भोपाळमध्ये एक महत्त्वपूर्ण जमीन आणि अनेक बंगल्यांचे भूखंड मिळवले. मात्र या मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने खरेदी करण्यात आल्या होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.’आम्ही सध्या हे तपशील व्हेरिफाय करत आहोत’, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

ED च्या अधिकाऱ्यांकडून भोपाळ, मध्य प्रदेशमधील मालमत्ता शोधण्यात येत असून त्याचे खरेदी तपशील, पेमेंट पद्धती, विक्रेते आणि ॲक्विझिशनचे तपशील तपासण्यात येत आहेत. चंद्राकरच्या वतीने मालमत्ता खरेदी करणाऱ्या व्यक्तीचीही ईडीने ओळख पटवली आहे. याशिवाय, मुंबईजवळील जमीनबाबत चंद्राकरच्या संपर्कात असलेल्या दलालाशी ईडीच्या अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट केला आहे.

पॅनेल ऑपरेटर्सवर ईडीचे लक्ष

ईडीचे अधिकारी आता महादेव ॲपच्या पॅनल ऑपरेटरवर लक्ष केंद्रित करत आहेत. या ऑपरेटर्सनी सौरभ चंद्राकरच्या वतीने जमीन खरेदी करण्यात आणि नफ्यातील 70 टक्के हस्तांतरित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. चंद्राकर यांच्या सूचनेनुसार त्यांनी त्यांच्या नफ्याचे पैसे मालमत्तेत गुंतवले.

अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर

महादेव ॲप प्रकरणात अनेक सेलिब्रिटी ईडीच्या रडारवर आहेत. रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, कपिल शर्मा, मलायका अरोरा, सुनील शेट्टी, सोनू सूद, संजय दत्त, हार्डी संधू, सुनिल ग्रोव्हर, सोनाक्षी सिन्हा, रश्मिका मंधाना, सारा अली खान, गुरु रंधावा, टायगर श्रॉफ,, रफ्तार, एम्सी दिप्ती साधवानी, यांसारख्या अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची नावे याप्रककरणी समोर आली आहेत.