उत्तरप्रदेश – सीतापूरमधील (Sitapur) खैराबाद (khairabad) येथील बडी संगतचे महंत बजरंग मुनी दास (Mahant Bajrang Muni Das) यांच्या एका व्हिडीओची युपीत चर्चा आहे. तो व्हिडीओ लोकांनी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल केला आहे. व्हिडीओत ते एका समाजाच्या महिलांबाबत अशोभनीय बोलत आहेत. हा व्हि़डीओ मागच्या आठवड्यातला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. एका शोभायात्रेत त्यांनी असं वक्तव्य केलं आहे. ज्यावेळी बजरंग मुनी दास बोलत होते त्यावेळी उपस्थित अनेकांनी हा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. हा व्हिडीओ पोलिसांच्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे पोलिसांनी व्हिडीओची दखल घेत तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास एएसपी सीतापूर यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
TRIGGER WARNING!
A Mahant in front of a Masjid in the presence of Police personals warns that He would K!dnap Muslim Women and ₹@pe them in Open.According to the locals near Sheshe wali Masjid, Khairabad, Sitapur. This happened on 2nd Apr 2022, 2 PM. @sitapurpolice @Uppolice pic.twitter.com/wkBNLnqUW0
— Mohammed Zubair (@zoo_bear) April 7, 2022
महंत बजरंग मुनी दास सध्या खूप चर्चेत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होण्यापूर्वी बजरंग मुनी दास संगत यांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्यामुळे खूप चर्चेत होते. तेथे स्थानिक नेत्यांचा मोठा ग्रुप आहे. ट्विटरच्या माध्यमातून पोलिसांना हा व्हिडीओ मिळाला आहे. त्यावर पोलिस आता काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
व्हायरल व्हिडीओची नीट चौकशी करण्यात येणार आहे . तसेच दोषी आढळल्यास कारवाई सुध्दा करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. जिथं वक्तव्य केलं, त्या परिसरात जाऊन पोलिस प्रात्प झालेल्या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. व्हिडीओच्या आधारे ज्या व्यक्ती दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल.