Aurangabad Suicide | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या

| Updated on: Dec 17, 2021 | 11:44 AM

आई घरातील कामं करत होती. बराच वेळ होऊनही वैभव बाहेर आला नाही. त्याला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दरवाजा तोडून बघितला असता वैभवने गळफास घेतला होता.

Aurangabad Suicide | स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या
औरंगाबादेत विद्यार्थ्याची आत्महत्या
Follow us on

औरंगाबाद : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली. ही घटना औरंगाबादमधील आडगाव बुद्रुक येथे बुधवारी दुपारी चार वाजता उघडकीस आली.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, वैभव विष्णू विरकल (वय 22 वर्ष, रा.आडगाव बुद्रुक) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. वैभवने बीएससी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तो आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, तर त्याची आई गृहिणी आहे.

नेमकं काय घडलं?

गुरुवार 15 डिसेंबर रोजी वैभवचे वडील कंपनीमध्ये गेले होते, तर भाऊ कॉलेजमध्ये होता. आई आणि तो दोघेच घरी होते. दुपारच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी तो त्याच्या खोलीत गेला. यावेळी आई घरातील कामं करत होती. बराच वेळ होऊनही वैभव बाहेर आला नाही. त्याला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दरवाजा तोडून बघितला असता वैभवने गळफास घेतला होता.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट

दरम्यान घरच्यांच्या मदतीने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अमालादर एस. बी. घुगे करत आहेत.

संबंधित बातम्या :

सावत्र बापानं सांगितलं मुलगा कोरोनानं गेला, इकडे कॉलनीतल्या तरुणांना काय दिसलं?

बनावट सोने तारण ठेवून थेट आयडीबीआय बँकेलाच घातला 38 लाखांना गंडा ; गुन्हा दाखल

अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार