औरंगाबाद : औरंगाबादमधील ट्रॅफिक पोलिसांच्या वसुलीचा चक्क आमदारानेच पर्दाफाश केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी ट्रक ड्रायव्हर बनून पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन केल्याचा दावा केला जात आहे. या प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे, परंतु या स्टिंग ऑपरेशनची ‘टीव्ही9 मराठी’ पुष्टी करत नाही.
काय आहे प्रकरण?
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड चाळीसगाव घाटात ट्रॅफिक पोलिसांनी जोरदार वसुली सुरु केल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या वसुलीचा भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी पर्दाफाश केला. ट्रक ड्रायव्हर असल्याचं भासवून आमदार चव्हाण यांनी पोलिसांच्या वसुलीचं स्टिंग ऑपरेशन केलं. प्रति गाडी 500 रुपये वसुली करणारे पोलीस आणि झिरो पोलीस कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
अवजड वाहनांसाठी 500 रुपयांची वसुली?
चाळीसगाव घाट धोकादायक झाल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र पैसे घेऊन ट्रॅफिक पोलीस धोकादायक घाटातून अवजड वाहने सोडत असल्याचा आरोप आहे. चाळीसगाव घाटातून अवजड वाहनांसाठी प्रत्येकी 500 रुपये घेतले जात असल्याचा दावा केला जातो. भाजप आमदाराने ट्रॅफिक पोलिसांचीही वसुली उघड केली. आमदारांनी धरपकड करताच पोलिसांची धावपळ उडाली होती.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
DRUGS: औरंगाबादेतही सूत्र हलली, नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त, स्थानिक पोलीस अॅक्शन मोडवर!
पोटच्या पोरीलाच प्रियकराच्या हवाली केलं, औरंगाबादेत आईसह आरोपींवर पोस्कोचा गुन्हा दाखल
प्रदूषण कमी करण्यासाठी औरंगाबादला पाच वर्षात मिळणार 87 कोटींचा निधी