बीड : बँकेतील पैशाच्या व्यवहारातून मुलाने वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्येनंतर मुलाने वडिलांचे अंत्यसंस्कारही घाईघाईत उरकले. पण पोलिसांना एक निनावी फोन गेला आणि हत्येचं बिंग फुटलं. या प्रकरणी बीडमधील पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
बँकेतील पैशाच्या व्यवहारातून मुलाने वडिलांची हत्या करुन अंत्यसंस्कार देखील उरकल्याच्या घटनेने बीडमध्ये खळबळ माजली आहे. ही घटना 23 ऑगस्ट रोजी पाटोदा तालुक्यातील पारनेर येथे घडली. महादेव औटे असं मयत पित्याचे नाव आहे.
पाच भावांनी अंत्यसंस्कार उरकले
हत्येनंतर आरोपी योगेश औटे याने चार चुलत भावांच्या मदतीने वडिलांचे अंत्यसंस्कार उरकले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना एक निनावी फोन गेला आणि हत्येचं बिंग फुटलं. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात मुलीकडून वडिलांची हत्या
दुसरीकडे, मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्येच 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात धुमसत होता.
संबंधित बातम्या :
साठवलेले 1500 रुपये वडिलांनी खर्च केल्याचा राग, लोखंडी दांड्याने मारहाण करुन मुलाकडून हत्या
मुलाची हत्या करुन आईने मृतदेह घरातच पुरला, नवीन टाईल्समुळे आत्याला सुगावा
शेजाऱ्याशी 50 रुपयांवरुन वाद, धडा शिकवण्यासाठी 22 वर्षीय तरुणाने बाळाला टँकमध्ये बुडवलं