धुळे : धुळे शहरात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, अशी ओरड कायम असते. आता मात्र ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे ती खाकीच सुरक्षिक नाही की काय, असा सवाल उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. धुळ्यात (Dhule Crime) भरदिवसा खाकी रक्तबंबाळ झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिले. किरकोळ कारणावरुन एका फौजदारावर वर्दळीच्या रस्त्यावर चाकू हल्ला (Knife Attack) झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
शिरपूरचे महामार्ग पोलिस ठाण्याचे अधिकारी पीएसआय एम.आय. मिर्झा हे त्यांच्या दुचाकीने श्रीराम पेट्रोल पंपाकडून बारापत्थर रस्त्याकडे जात होते. यावेळी समोरुन येणाऱ्या दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन दुचाकीस्वाराने वाद घातला. त्यानंतर मागचा पुढचा विचार न करता थेट खाकीवरच घाव घातला.
अज्ञात दुचाकीस्वाराने पीएसआय मिर्झा यांच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मिर्झा जबर जखमी झाले आहेत. त्यांना धुळ्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दुपारी उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु होती.
संबंधित बातम्या :
काळही आला, वेळही आली, मधमाशांच्या हल्ल्यातून वाचण्यासाठी कालव्यात उडी, तरुणाचा बुडून मृत्यू
जेसीबीनं तहसीलदाराला चिरडण्याचा प्रयत्न, वाळूमाफियाच्या कृत्यानं वैजापुरात खळबळ!
चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकाचे हल्लेखोर अटक, हटकल्याच्या रागातून केला होता हल्ला