नांदेड : हरियाणाच्या करनाल (Karnal Haryana) इथे पोलिसांनी शस्त्र साठ्यासह अटक केलेले चार दहशतवादी (Terrorists) नांदेडमध्ये तब्बल चार दिवस मुक्कामी होते, अशी माहिती समोर आली आहे. 30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे चौघे जण नांदेडमध्ये वास्तव्यास होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी (Nanded Crime News) दिली आहे. या चार दिवसांत ते कुणाकुणाला भेटले याची माहिती जमा करण्याचा युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, याच दहशतवाद्यांनी नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवले अशी चर्चा आहे. मात्र या चर्चेला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी नाकारले आहे.
पोलिसांच्या मते त्यांनी आरडीएक्स नांदेडमध्ये पुरवल्याची कुठलीही माहिती मिळत नाहीये. विशेष म्हणजे 5 एप्रिल रोजी बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची पिस्तूलातून गोळ्या झाडत हत्या झाली होती. त्यामुळे दहशतवादी नांदेडला येऊन गेल्या नंतर लगेच बियाणीची हत्या झाली होती यात त्यांचा काही संबंध आहे का हे पोलीस तपासत आहेत.
दरम्यान, हे दहशतवादी नांदेडला येऊन गेल्याने त्यांच्या इकडच्या कारवाया तपासण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. नांदेडहून हे चारही दहशतवादी बिदर मार्गे गोवा कडे गेल्याचे सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
30 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान हे चौघे जण नांदेडमध्ये वास्तव्यास होते, अशी धक्कादायक माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या चार दिवसांत त्यांनी कोणाकोणाची भेट घेतली, याची माहिती जमा करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
चौघा दहशतवाद्यांनीच नांदेडमध्ये आरडीएक्स पाठवल्याची चर्चा सुरु आहे. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या चर्चांचे खंडन केले आहे. पोलिसांच्या मते त्यांनी आरडीएक्स नांदेडमध्ये पुरवल्याची कुठलीही माहिती उपलब्ध झालेली नाही.
अटक केलेले चार जण हे कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ रिंदाचे साथीदार आहेत. रिंदा हा मूळचा नांदेडचा असल्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा रिंधाची माहिती गोळा करतायत.