जळगाव : वीज बिलाची वसुली करण्यासाठी गेलेल्या अभियंत्याला मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चक्क थकबाकी असलेल्या ग्राहकानेच अभियंत्याला बेदम मारहाण केली. जळगाव जिल्ह्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
खोदकाम कामासाठी वापरला जाणारा टिकाव थकबाकी असलेल्या ग्राहकाने सहाय्यक अभियंत्याच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला. अभियंत्यांसोबत असलेल्या इतर दोन कर्मचार्यांनी वेळीच त्याला पकडून बाजुला केले. अन्यथा दुर्घटना घडली असती.
दरम्यान या प्रकरणी एकच खळबळ उडाली असून अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे थकबाकी वसुलीसाठी वरिष्ठांकडून सक्ती केली जात असल्याने आता थकबाकी करायची कशी, असाही प्रश्न कर्मचाऱ्यांमधील उपस्थित होत आहे.
पाहा व्हिडीओ :
संबंधित बातम्या :
Gorai Car Accident | भाचीचं ऐकलं असतं तर? ड्युटीवर निघालेल्या मामाचा कारच्या धडकेत मृत्यू
Nagpur Crime | संशयास्पद स्थितीत ट्रक आढळला; ट्रकमध्ये सापडले 17 लाखांचे घबाड
नोटा मोजताना आयकर विभागाचे हात दुखले, मशीन मागवली, घरात 150 कोटींचे घबाड?