हुश्श ! रुग्णालयतातून चोरीला गेलेलं एक दिवसांचं अर्भक सापडलं, महिलेने सांगितलं बाळ चोरण्याचं कारण

| Updated on: Feb 08, 2022 | 12:48 PM

सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास या बाळाची काकू बाळाला रुग्णालयातील परिसरात कोवळ्या उन्हात घेऊन बसली होती. यावेळी कपडे वाळायला टाकायचे म्हणून बाळाला त्याच्या काकूने एका महिलाकडे सुपूर्द केले. मात्र पुढच्या काही मिनिटात या बाळाला घेऊन त्या महिलेने पळ काढला.

हुश्श ! रुग्णालयतातून चोरीला गेलेलं एक दिवसांचं अर्भक सापडलं, महिलेने सांगितलं बाळ चोरण्याचं कारण
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

जालना : महिला आणि बाल रुग्णालयातून चोरीला गेलेल्या नवजात बाळाचा (New Born Baby Kidnap) अखेर शोध लागला आहे. बाळाची काकू त्याला कोवळ्या उन्हात घेऊन बसली असताना हा प्रकार घडला होता. मूल होत नसल्याने एका महिलेने बाळ चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी सकाळी जालन्यातील (Jalna) महिला आणि बाल रुग्णालय परिसरातून नवजात अर्भकाची चोरी झाली होती. मात्र अवघ्या काही तासांतच पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम पोलिसांच्या संयुक्त पथकाला बाळ परत मिळवण्यात यश आले आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू येथून आफरिन शेख नावाच्या महिलेला बाळासह ताब्यात घेण्यात आले आहे. कपडे वाळत टाकण्यासाठी काकूने बाळाला एका महिलेकडे सोपवले, त्यावेळी पुढच्या काही मिनिटांतच संबंधित महिला बाळासह पसार झाली होती.

बाळ आईच्या कुशीत

महिला आणि बाल रुग्णालयातून चोरीला गेलेल्या नवजात बाळाचा अवघ्या काही तासांतच शोध लागल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडला आहे. पोलिसांचे पथक आज (मंगळवारी) बाळ चोरणारी महिलेला आणि नवजात बाळाला घेऊन जालना येथे दाखल झाले. बाळाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर बाळाला आईच्या कुशीत देण्यात आले.

काय आहे प्रकरण?

सोमवारी सकाळी जालन्यातील महिला आणि बाल रुग्णालय परिसरातून एक दिवसाच्या अर्भकाची चोरी झाली होती. रुकसाना शेख या महिलेची जालना शहरातील महिला आणि बाल रुग्णालयात प्रसुती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

नेमकं काय घडलं?

सोमवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास या बाळाची काकू बाळाला रुग्णालयातील परिसरात कोवळ्या उन्हात घेऊन बसली होती. यावेळी कपडे वाळायला टाकायचे म्हणून बाळाला त्याच्या काकूने एका महिलाकडे सुपूर्द केले. मात्र पुढच्या काही मिनिटात या बाळाला घेऊन त्या महिलेने पळ काढला.

भरदिवसा रुग्णालयातून नवजात बाळ चोरुन नेल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि कदीम पोलिसांच्या संयुक्त पथकाला बाळ परत मिळवण्यात यश आले आहे.

मूल होत नसल्याने बाळाची चोरी

परभणी जिल्ह्यातील सेलू येथून आफरिन शेख नावाच्या महिलेला बाळासह ताब्यात घेण्यात आले आहे. चोरी करणाऱ्या महिलेला अपत्य होत नसल्याने तिने बाळाची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईतील नायर रुग्णालयातून पाच दिवसांचं बाळ चोरीला

बस प्रवासातील ओळखीतून बाळाचं अपहरण, पुण्यातील महिला अवघ्या काही तासात पोलिसांच्या ताब्यात

साताऱ्यात घरात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बाळाचे अपहरण, दुचाकीवरुन आलेल्या जोडप्यावर संशय