सात वर्षांच्या दत्तक मुलीसह नदीत उडी, कोल्हापुरात मायलेकीची आत्महत्या

| Updated on: Aug 26, 2021 | 9:29 AM

दत्तक घेतलेली मुलगी गतिमंद असल्याच्या नैराश्येतून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे वारणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सात वर्षांच्या दत्तक मुलीसह नदीत उडी, कोल्हापुरात मायलेकीची आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

कोल्हापूर : सात वर्षांच्या चिमुकलीसह आईने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली आहे. वारणा नदीत उडी घेऊन महिलेने मुलीसह आयुष्य संपवलं. दत्तक घेतलेली मुलगी गतिमंद असल्याच्या नैराश्येतून आईने टोकाचं पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

काय आहे प्रकरण?

कोल्हापुरातीस कोडोली – चिकुर्डे धरण पुलावरुन महिलेने मुलीसह नदीत उडी घेतल्याचा आरोप आहे. आई आणि मुलगी पन्हाळा तालुक्यातील कोडोलीच्या रहिवासी होत्या. दत्तक घेतलेली मुलगी गतिमंद असल्याच्या नैराश्येतून महिलेने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. या घटनेमुळे वारणा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

साताऱ्यात मुलांना संपवून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

दरम्यान, सातारा जिल्ह्यात एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आईने आपल्या पोटच्या मुलांचीच गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: विषारी औषध प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न केला, पण ती बचावली. सध्या तिची प्रकृती गंभीर आहे. कराडच्या एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत.

महिलेची प्रकृती गंभीर

35 वर्षीय महिलेने आपल्या पोटच्या 6 आणि 9 वर्षीय मुलांची गळा दाबून हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिलेने स्वत: विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. महिलेची सध्या प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. “सहा महिन्यांपूर्वी अपघातात पतीचे निधन झाले. पतीच्या निधनामुळे मी व्यथित झाली आहे. त्यामुळे मन खचल्याने मी हे कृत्य करत आहे”, अशी सुसाईड नोट पोलिसांना घटनास्थळी पोलिसांना मिळाली आहे.

संबंधित बातम्या :

आधी पतीने हॉटेलात विष पिऊन जीव दिला, दहाव्या दिवशी उच्चशिक्षित मायलेकीचीही आत्महत्या

साताऱ्यातील धक्कादायक घटना, मातेने पोटच्याच लेकरांना संपवलं, जन्मदाती आईने इतक्या टोकाचा निर्णय का घेतला?