कोल्हापूर : घोरपडीवर बलात्कार (Rape on Bengal monitor lizard) केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्यानंतर जवळपास आठवडाभराने चौघा जणांना अटक करण्यात आली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात ही धक्कादायक घटना घडली होती. रत्नागिरी जिल्ह्यातील गोठणे गावात हा भूतो न भविष्यति प्रकार समोर आला. चांदोली राष्ट्रीय उद्यानात अवैधरित्या घुसल्याप्रकरणी चौघा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोकणातील आरोपींना जेरबंद केलं. त्यांच्या चौकशी घोरपडीवरील बलात्काराचा किळसवाणा प्रकार घडला होता. धक्कादायक म्हणजे घोरपडीवरील लैंगिक अत्याचाराचा व्हिडीओही शूट करण्यात आला होता.
चौघा आरोपींपैकी एकाने शिकारीसाठी बंदूक जवळ बाळगल्याचं पाहिल्याचंही एका अधिकाऱ्याने सांगितलं. जंगलात अवैधरित्या घुसल्याप्रकरणी 31 मार्च रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर चौकशी सुरु असताना घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक कबुली त्यांनी दिली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी अशा चार जिल्ह्यात पसरलेला आहे.
अल्पवयीन मुली, मुलं, वृद्धा यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेकदा ऐकायला मिळतात. कुत्र्या-मांजरांसारख्या मुक्या प्राण्यांनाही आपल्या वासनेची शिकार बनवल्याची मोजकी उदाहरणं आतापर्यंत समोर आली आहेत. मात्र घोरपडीवर बलात्कार झाल्याची अभूतपूर्व घटना उजेडात आली आहे.
संदीप तुकाराम पवार, मंगेश कामटेकर, अक्षय कामटेकर आणि रमेश घाग अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींपैकी एकाने घोरपडीवर बलात्कार करतानाचा व्हिडीओही कॅमेरात चित्रित केल्याचं समोर आलं आहे.
“आम्ही आरोपींकडून संबंधित सर्व पुरावे जप्त केले असून, त्यांना सुरुवातीला वन विभागाची कोठडी देण्यात आली होती, परंतु आता ते जामिनावर बाहेर आहेत” असंही एका वन अधिकाऱ्याने सांगितलं. त्यांना प्रत्येक सोमवारी या प्रकरणाची चौकशी करून वनाधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.
चौघा आरोपींवर वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे (STR) क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
घृणास्पद! कोल्हापुरात घोरपडीवर बलात्कार, कोकणातून तरुण ताब्यात
पतीला सेल्फी पाठवण्याची धमकी देत बलात्कार; सोशल मीडियातली मैत्री पडली महागात