लातूर : बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची मेहुण्यांनीच हत्या (Murder) केली. लातूर शहरातील (Latur Crime) नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे. बहिणीला भाऊजी (Brother in law) त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. दोघा मेहुण्यांसह त्यांच्या आणखी दोन साथीदारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बहिणीला त्रास दिल्याचा राग आल्याने मेहुण्यांनीच भाऊजींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूर शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे.
बहिणीला भाऊजी त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) जखमी झाले होते. विजयकुमार यांना दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आरोपी मेव्हुणे गणेश चटनाळे (वय 23 वर्ष), बसवराज चटनाळे (वय 32 वर्ष) यांचे साथीदार ओंकार धोत्रे (वय 20 वर्ष), शहानवाज पठाण (वय 21 वर्ष) या चौघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
बहिणीच्या दुसऱ्या लग्नाला आक्षेप, भावाचा प्राणघातक हल्ला, ताईसह होणारा नवरा गंभीर जखमी
अनैतिक संबंधांचा संशय, बाईकवर बसवून मनमाड रोडवर नेलं, तरुणाकडून मेव्हण्याची हत्या
वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार