लातूर : पोलीस कर्मचाऱ्याने (Police) केलेल्या आत्महत्या (Suicide) प्रकरणी आता 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . आरोपींमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. साहेबराव सावंत या जमादाराने गोळी झाडून आत्महत्या केली होती. लातूर जिल्ह्यातील किल्लारी भागात (Latur Crime) शनिवारी मध्यरात्री हा प्रकार घडला होता. आर्थिक व्यवहारासाठी दिलेले 9 लाख रुपये परत मिळत नसल्याने सावंत मानसिक तणावात असल्याचं बोललं जातं. साहेबरावांनी ऑन ड्युटी असतानाच स्वतःवर गोळी झाडून आयुष्याची अखेर केली.
आर्थिक व्यवहारासाठी दिलेले 9 लाख रुपये परत मिळत नसल्याने ते मानसिक तणावात होते. पैशांच्या मागणीवरुन आरोपी आणि सावंत यांच्यात अनेकदा वादही झाले होते. याच तणावात साहेबराव सावंत यांनी किल्लारी पोलीस ठाण्यात ड्युटीवर असताना गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती.
सावंत यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या दोन पानांच्या सुसाईड नोटवरून 12 जणांवर किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साहेबराव सावंत हे किल्लारी पोलीस ठाण्यात नाईट ड्युटीवर होते. मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास त्यांनी ठाण्यात ठेवलेल्या बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
साहेबराव सावंत हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि पत्नी असा परिवार आहे. आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं.
संबंधित बातम्या :
शेतीचं कर्ज फेडायचं कसं? नैराश्यातून तिनं जीवन संपवलं, औरंगाबादेत शेतकरी पत्नीच्या आत्महत्येनं हळहळ
पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो
नागपुरात त्रिकोणी कुटुंबाचा दुःखद अंत, पत्नी आणि मुलीची हत्या करुन पतीने आयुष्य संपवलं