पंढरपूर : इंजिनिअर तरुणाने प्रेम प्रकरणातून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखिल दत्तात्रय चांडोले असं टोकाचं पाऊल उचलणाऱ्या तरुणाचं नाव आहे. तो 24 वर्षांचा होता. निखिल मूळ सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील (Pandharpur) रहिवासी होता. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात त्याने आयुष्याची अखेर केली. गळफास घेऊन निखिलने आपली जीवनयात्रा संपवली. प्रेम प्रकरणातून त्याने आत्महत्येसारखं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. निखिलच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाईड नोट (Suicide Note) सापडली आहे. “तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” या हिंदी गाण्याच्या ओळी त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत सापडल्या आहेत. या घटनेमुळे निखिलच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रेम प्रकरणातून पंढरपूरच्या इंजिनिअर तरुणाने पैठण येथे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. निखिल दत्तात्रय चांडोले (वय 24 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रेम प्रकरणातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले यांचा निखिल हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे चांडोले कुटुंबीय शोकसागरात बुडाले असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठीमध्ये त्याने “तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” या हिंदी चित्रपटातील गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. निखिलने इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत नोकरी करत होता.
संबंधित बातम्या :
नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला
रानडुक्कर शिकार प्रकरणात रंगेहाथ अटक, आरोपीची शेतात आत्महत्या
हरियाणात पत्नी आणि सासूच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या