सांगली : ऊसाच्या शेतात चक्क गांजाची (cannabis) लागवड केल्याचा प्रकार समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील पांढरेवाडी येथील मुंजेवस्ती येथे ही घटना उघडकीस (Sangli Crime) आली आहे. सांगली गुन्हे अन्वेषण यांनी छापा टाकला. यावेळी दोन लाख 57 हजार रुपये किमतीचा गांजा सापडला. 25 किलो 700 ग्रॅम इतक्या वजनाचा हा गांजा होता. उमदी पोलिसांनी शेतकऱ्याला (Farmer) ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
पांढरेवाडी पासून दोन किलोमीटर अंतरावर मुंजे वस्ती आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण सांगली यांना खास खबऱ्याच्या मार्फत याविषयी माहिती मिळाली. अंबादास शेषापा तांबे यांच्या ऊसाच्या शेतात गांजा लागवड केल्याचं पोलिसांना समजलं.
त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकला असता ऊसाच्या शेतात एकूण 25 किलो 700 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. बाजार भावाप्रमाणे पंचनामा केला असता त्याची किंमत दोन लाख 57 हजार रुपये इतकी असल्याचं स्पष्ट झालं.
सांगली गुन्हे अन्वेषण आणि उमदी पोलीस यांनी पंचा समक्ष अंबादास तांबे यांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुन्हे अन्वेषण विभाग आणि उमदी पोलिसांनी कारवाई केली आहे.
संबंधित बातम्या :
कॅटरिंगच्या व्यवसायाखाली मानवी तस्करी, एका कॉलमुळे नागपुरातील रॅकेटचा भांडाफोड
1 कोटी 85 लाखांचे दीड किलो ड्रग्ज जप्त, नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई
मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश