सोलापूर : पेट्रोल चोरणाऱ्या कला शिक्षकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात पहाटे तीन ते चार वाजताच्या सुमारास शिक्षक गाड्यांमधून इंधनचोरी करत होता. सोलापुरातील एका नामांकित विद्यालयात तो कला शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे.
सन्मती नगर भागात ही घटना उघडकीस आली आहे. सागर सहदेव लाड (रा. वाफळे, ता. मोहोळ) असं पकडलेल्या पेट्रोल चोराचे नाव आहे. आण्णाराव नागनाथ खंडागळे यांनी माढा पोलिसांत फिर्याद दिल्यानुसार सागर लाड याच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
सागर लाड हा सध्या मोहोळ मधील एका विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सन्मतीनगर भागातील मोटारसायकलमधून पेट्रोल चोरी होत होती. यामुळे वाहन चालक त्रस्त झाले होते.
पहाटे आण्णाराव खंडागळे, लक्ष्मण पाटेकर, बापू पाटेकर, राहुल नरखेडकर आणि इतर जणांच्या घरासमोर लावलेल्या मोटारसायकलमधील पेट्रोल काढून चोरुन घेऊन जात असताना विनायक जाधव, अजिंक्य काटे, प्रविण जगदाळे, लक्ष्मण पाटेकर यासह अन्य लोकांनी जागीच पकडले. सागर लाड याने पोलिसांना गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या अन्य साथीदारांचा माढा पोलिस शोध घेत आहेत.
संबंधित बातम्या :
जेलमधून दोनदा पळाला, कल्याण स्टेशनबाहेर मोबाईल चोरणारा भामटा पोलिसांच्या जाळ्यात कसा सापडला?
पोलीस भरती परीक्षेत ‘मुन्नाभाई’ स्टाईल कॉपीला मदत, औरंगाबादेतील पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
Nagpur Crime | दोन बहिणींमध्ये हाणामारी, एकीचा गेला जीव; कारण काय?