विरार : विरारमध्ये गेल्या काही दिसांपासून सोनसाखळी चोरांनी हैदोस घातला आहे (Virar Chain Snatchers). त्या अनुषंगाने विरार पोलिसांनी तपास केला असता या सोनसाखळी चोरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. या आरोपींनी एकट्या विरार हद्दीत 14 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 लाख 74 हजार 950,रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपीकडून हस्तगत केला आहे (Maharashtra Crime News Virar Chain Snatchers Arrested By Virar Police).
पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचं नाव अजय किरण शाह (वय 21) आहे. याचे साथीदार विरार पूर्व गास कोपरी परिसरात सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकला बाहेर पडणाऱ्या महिलांना टार्गेट करुन सोनसाखळी चोरुन फरार होत असत.
वसई-विरार, मीरा-भाईंदर आयुक्तालयाचे अपर पोलीस आयुक्त प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तांत्रिक तपास करुन एकट्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींनी 14 गुन्हे केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरली गेलेली 50 हजार रुपये किमतीची होंडा शाईन मोटारसायकल, 5 लाख 24 हजार 950 रुपये किंमतीचे 153 ग्रॅम वजन असणारे सोन्याचे दागिने, असा एकूण 5 लाख 74 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल विरार पोलिसांनी आरोपींकडून हस्तगत केला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून यातील जो मुख्य आरोपी आहे शंकर हाल्या दिवा हा याआधीही घडलेल्या गुन्हात ठाणे तुरुंगात आहे. विरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. विरार पोलीस आता या गुन्ह्यात अजून काही धागेदोरे सापडतात का? याचा अधिक तपास करत आहेत.
सातपुडा वनक्षेत्रात अवैध धंदा करणाऱ्या अड्ड्यावर धाड, 51 जणांच्या मुसक्या आवळल्याhttps://t.co/2KnHyZCaab #jalgaon #crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
Maharashtra Crime News Virar Chain Snatchers Arrested By Virar Police
संबंधित बातम्या :
गजा मारणेच्या ‘त्या’ मिरवणुकीतील 100 जण गजाआड, आलिशान गाड्या, मोबाईलही जप्त!