नागपुरात लष्कराच्या निवृत्त जवानाच्या घरी शस्त्र आढळल्याने खळबळ, जवानाला अटक

| Updated on: Mar 09, 2021 | 2:15 PM

नागपुरातील रघुजी नगर परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त जवानाच्या घरात शस्त्र आढळून (Weapons Found) आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

नागपुरात लष्कराच्या निवृत्त जवानाच्या घरी शस्त्र आढळल्याने खळबळ, जवानाला अटक
Nagpur Weapons Found
Follow us on

नागपूर : नागपुरातील रघुजी नगर परिसरात राहणाऱ्या एका निवृत्त जवानाच्या घरात शस्त्र आढळून (Weapons Found) आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाी पोलिसांनी या निवृत्त जवानाला अटक करुन तपास सुरु केला आहे (Maharashtra Crime News Weapons Found At The Home Of A Retired Army Soldier).

नागपूरच्या सक्करदरा पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, रघुजी नगर परिसरातील एका घरात शस्त्र साठा आहे. यावरुन पोलिसांनी मारोती कोठेकर नावाच्या व्यक्तीच्या घरी झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरात एक देशी कट्टा, एक छर्रे्याची बंदूक, दोन मोठ्या तलवारी आणि जिवंत काडतुसे आढळून आली.

निवृत्त जवानाच्या घरी शस्त्र

पोलिसांनी त्यांची विचारपूस केली असता ते निवृत्त जवान असल्याची माहिती पुढे आली. त्यांनी हे शस्त्र मला मिळाले असल्याचं सांगितलं. मात्र, ते कुठून मिळाले याचा खुलासा केला नाही. पोलीस आता तपास करत आहे की, हे शस्त्र त्यांनी कुठून आणले आणि ते घरात ठेवण्याच्या मागचा त्यांचा काय उद्देश होता.

मारोती कोठेकर हे लष्करातून 2017 मध्ये निवृत्त झाले होते. देशासाठी सेवा देणाऱ्या जवानाला घरात शस्त्र ठेवण्याची गरज का पडली हा मोठा प्रश्न आहे. त्याची उत्तर आता पोलीस शोधत आहे. याप्ररकरणी पोलिसांनी जवानाला अटक केली आहे.

नागपुरात हत्यांचं सत्र थांबेना

नागपुरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याअंतर्गत एका वृद्ध व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. 65 वर्षीय लक्ष्मण मलिक असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मृतकाचे हात बांधून गळा चिरुन त्याची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या का झाली असावी त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

Maharashtra Crime News Weapons Found At The Home Of A Retired Army Soldier

संबंधित बातम्या :

मुख्याध्यापकाकडून विद्यार्थिनीवर शाळेतच बलात्कार, महाबळेश्वर हादरलं

घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, एकीचा कान कापला