मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई करत मुंबईतील नागपाडा भागातून 7 किलो युरेनियम जप्त केले. एटीएसने अटक केलेले दोन्ही आरोपी हे उच्चशिक्षित म्हणजे डबल ग्रॅज्युएट आहेत. एटीएसच्या प्राथमिक तपासात आरोपींनी त्यांच्याकडे हे युरेनियम भंगारातून आल्याचा दावा केला आहे. मात्र 21 कोटी 30 लाखांचे युरेनियम नेमके कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत. एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे (ATS DIG Shivdeep Lande) या प्रकरणी कारवाई करत आहेत. (Maharashtra Crime Two people arrested for illegal possession of Natural Uranium in Nagpada Mumbai ATS DIG Shivdeep Lande)
दोन महिन्यांपूर्वी युरेनियमविषयी माहिती
फेब्रुवारी महिन्यात हे युरेनियम आरोपींकडे असल्याची खात्रीशीर माहिती एटीएसला मिळाली होती. त्यानुसार हे युरेनियम तपासणीसाठी BARC या वैज्ञानिक संस्थेत पाठवण्यात आले होते. जवळपास दोन महिन्यांनतर हे युरेनियमच असून ते नैसर्गिक आहे, त्यामुळे त्याची तीव्रता अधिक असल्याचं स्पष्ट झालं. एटीएसने गुन्हा दाखल करुन आरोपी जिगर पांड्या आणि अबू ताहीर यांना अटक केली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता अॅटोमिक रिसर्च विभाग नागपूरच्या प्रादेशिक संचालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एटीएसने तब्बल दोन महिन्यांतर गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केलीय.
पाच-सहा वर्षांपूर्वी युरेनियम सापडलं
एटीएसने अटक केलेले आरोपी जिगर पांडया आणि अबू ताहिर दोघंही एकमेकांचे कॉलेजपासून मित्र आहेत. जिगर पांड्या आयटी कंपनीत काम करतो, तर अबू ताहिर इम्पोर्ट-एक्स्पोर्टचं काम करतो. दोघांनीही MBA केलं आहे. ताहिरच्या वडिलांचा गोवंडी येथे भंगारचा व्यवसाय होता. एका भंगाराच्या ट्रकमधून पाच ते सहा वर्षांपूर्वी हे युरेनियम आलं होतं.
लॉकडाऊनमध्ये युरेनियम पुन्हा बाहेर
युनिक पदार्थ असल्याने त्यांनी तो कपाटात ठेवला होता. मात्र ते युरेनियम आहे याची त्यांना कल्पना नव्हती. अबू ताहीरला जेव्हा हा तुकडा फेब्रुवारी 2021 मध्ये तो दिसला. त्यावेळी त्याने लॉकडाऊनमध्ये सोशल मीडियावर या धातूबाबत रिसर्च केले. त्याचा मित्र जिगर हा आयटी कंपनीत असून तो अशा खासगी लॅब मालकांच्या संपर्कात असल्याने अबूने त्याला या धातूचा एक तुकडा तपासणीसाठी दिला.
25 कोटींना विक्रीस काढले
तपासणीत हे युरेनियम असल्याचं लक्षात आलं. त्याची खरी किंमत 21 कोटी 30 लाख रुपये होती. मात्र, त्यानंतर जिगर पांड्याने हे युरेनियम 25 कोटींना विकायला काढले. याची माहिती एटीएसला फेब्रुवारीत मिळाली. या माहितीच्या आधारे एटीएसमधील एक अधिकारी गुजराती व्यावसायिक बनून गेला. त्याने त्याचा लेत मशिनचा व्यवसाय असल्याचं सांगितलं. त्यानंतर पंचनामा करून हे 7 किलो युरेनियम एटीएसच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं आणि ते बार्कला तपासणीसाठी पाठवून दिलं.
जवळपास दीड महिन्यानंतर बार्कने याचा अहवाल एटीएसला सोपवला. ज्यामध्ये हे बार्कने हे युरेनियम घातक असून हा प्रकार गंभीर असल्याचं सांगितलं. त्यानुसार एटीएसने ही कारवाई केलीय. हे युरेनियम आरोपींकडे कसे आले, त्याचा वापर आणखी कोणत्या घातपाताच्या उद्देशाने करण्यासाठी आरोपींनी ते स्वतःजवळ बाळगलं होतं का, याचा तपास आता एटीएसकडून केला जात आहे. (Natural Uranium ATS Shivdeep Lande)
Maharashtra | Two people were arrested in connection with illegal possession of Natural Uranium in Nagpada area of Mumbai, yesterday. Police seized about 7 kg 100 grams of Natural Uranium worth Rs 21.30 crores. Case has been registered under Atomic Energy Act, 1962.
— ANI (@ANI) May 6, 2021
संबंधित बातम्या :
मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, ATS चे DIG शिवदीप लांडे यांची फेसबुक पोस्ट
हिरेन मृत्यूप्रकरणाचा उलगडा करणारे ATS प्रमुख IPS शिवदीप लांडे शिवसेना नेत्याचे जावई
(Maharashtra Crime Two people arrested for illegal possession of Natural Uranium in Nagpada Mumbai ATS DIG Shivdeep Lande)