CRIME NEWS : दोन भिंतीना भगदाड पाडून ज्वेलर्सचे दुकान लुटले, गॅस अचानक बंद झाल्याने तिजोरी….

| Updated on: Aug 20, 2023 | 8:28 AM

KALYAN CRIME NEWS : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हुशार चोरट्यांनी चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली असल्यामुळे पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत.

CRIME NEWS : दोन भिंतीना भगदाड पाडून ज्वेलर्सचे दुकान लुटले, गॅस अचानक बंद झाल्याने तिजोरी....
Kalyan crime news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कल्याण : कल्याणमध्ये (KALYAN CRIME NEWS) दिवसेंदिवस चोरीचं प्रमाण वाढतं असल्याचं पाहायला मिळत आहे. क्राईमच्या घटना (crime news in marathi) घडत असल्यामुळे पोलिस सुध्दा चक्रावून गेले आहेत. विशेष म्हणजे नुकतीच झालेली चोरी अनेकांसाठी धक्कादायक होती. चलाक चोरट्यांनी एका ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी नवी शक्कल लढवली आहे. पहिल्यांदा भिंतीला भगदाड पाडलं, त्यानंतर गॅस कटर आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर अचानक गॅस कटरमधील गॅस संपल्याने चोरटे पसार झाले आहेत. हा सगळा प्रकार ज्वेलर्सच्या मालकांनी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये (khadakpada police station) सांगितला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. त्याचबरोबर लवकरचं आरोपींना ताब्यात घेऊ असा विश्वास सुध्दा पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तीन दुकानांच्या दोन भिंतींना भगदाड

तीन दुकानांच्या दोन भिंतींना चोरट्यांनी भगदाड पाडले, कुणीचं नसल्याचे पाहून चोरटे ज्वेलर्सच्या दुकानात मध्यरात्री घुसले. मात्र, कटर मशिनचा गॅस अचानक संपल्यामुळे चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला. चोरटे ज्वेलर्समधील मुख्य लॉकर तोड शकले नाहीत. मात्र, दुकानाच्या शोकेसमध्ये असलेले दागिने घेऊन पसार झाल्याचे ज्वेलर्स मालकांनी सांगितले आहे.

सीसीटिव्ही पहिल्यांदा निकामी केला

मध्यरात्री ज्यावेळी चोरटे दुकानात शिरले, त्यावेळी त्यांनी दुकानात असलेला सीसीटिव्ही पहिल्यांदा निकामी केला.त्याचबरोबर गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु गॅस मध्येचं बंद झाल्यामुळे त्यांना काहीचं करता आले नाही असं पोलिसांनी सांगितलं आहे.

हे सुद्धा वाचा

मागच्या काही दिवसापूर्वी ज्वेलर्सची दोन दुकाने सोडून तरुणांनी मोबाईल शॉप सुरु करण्यासाठी एक गाळा भाड्याने घेतला होता. या तरुणांकडूनही ही दुकानफोडी केली असावी अशी तिथल्या परिसरात चर्चा आहे. खडकपाडा पोलिस चोरट्यांचा सीसीटिव्हीच्या माध्यमातून शोध घेत आहेत. हा प्रकार घडल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. ज्यावेळी चोरटे ताब्यात घेतले जातील, त्यावेळी आणखी काही गोष्टी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.