उस्मानाबाद शहरात झेंडे लावण्यावरुन दोन गटात दगडफेक, 150 जणांवर गुन्हा

| Updated on: Oct 20, 2021 | 11:12 AM

झेंडा लावण्याच्या कारणावरून दगडफेक झाली. दगडफेक व पोलिसांवर हल्ला प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

उस्मानाबाद शहरात झेंडे लावण्यावरुन दोन गटात दगडफेक, 150 जणांवर गुन्हा
Follow us on

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहरात झेंडे लावण्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान दगडफेक झाली. तीन ते चार पोलिस कर्मचारी या दगडफेकीत जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दोन गटात तुफान दगडफेकीने शहरात तणावाचे वातावरण वातावरण झाले होतो, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

दगडफेक व पोलिसांवर हल्ला प्रकरणी 43 प्रमुख आरोपींसह 150 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे, तर 6 पोलीस जखमी झाले आहेत. कलम 307 सह अन्य 10 वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. उस्मानाबाद शहर पोलिसात गुन्हा नोंद असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

कोजागिरी पौर्णिमा आणि ईद या दोन सणावेळी दोन्ही समाजाचे झेंडे लावण्याच्या कारणावरून काल (मंगळवारी) दुपारी दोन गट विजय चौक येथे आमनेसामने आले. त्यावरुन दोन्ही गटाकडून काही पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल करण्यात आल्या. त्यानंतर झेंडा लावण्याच्या कारणावरून दगडफेक झाली. मात्र सध्या स्थिती नियंत्रणात असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे.

वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी

दुसरीकडे, वसईत दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसई पश्चिम अंबाडी रोडवरील भाजी मार्केटसमोरील मध्यरात्री सव्वाबारा वाजताची ही दृश्यं आहेत.

काय आहे प्रकरण?

भर रस्त्यावर दोन गटांमध्ये ठोसा-बुक्क्यांनी हाणामारी झाली. मात्र ही मारामारी करणारे कोण आहेत, नेमकी का मारामारी करत आहेत, हे मात्र स्पष्ट झाले नाही. मात्र हाकेच्या अंतरावर माणिकपूर पोलीस ठाणे असतानाही मारामारी करणाऱ्यांची एवढी हिंमत वाढल्याने वसईत कायदा सुव्यस्था आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पोलीस आयुक्तालय स्थापन, मात्र गस्तीवर पोलीस नाही

वाढत्या लोकसंख्येनुसार गुन्हेगारी रोखण्यासाठी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालय स्थापन होऊन सव्वा वर्ष उलटले आहे. तरीही एकही पोलीस कर्मचारी रात्रीचा गस्तीवर नाही. त्यामुळेच वसई विरारची सुरक्षा सध्या रामभरोसेच चालू आहे की काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, टिळक रोडवर झोपून गाड्या अडवण्याचा प्रयत्न

VIDEO | अंबरनाथमध्ये भररस्त्यात मद्यधुंद तरुणीचा धिंगाणा, पादचाऱ्यांना शिवीगाळ