कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा-महाविद्यालयं पुन्हा खुली झाली आहेत. दीर्घ कालावधीनंतर कॉलेजला निघालेल्या विद्यार्थ्यांना अपघात झाल्याची दुर्दैवी घटना नुकतीच समोर आली.
नाशिक जिल्ह्यात कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बसला मोठा अपघात झाला. अपघातानंतर बस आडवी झाल्याचं पाहायला मिळालं.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करणाऱ्या बसला अपघात झाला.
बस आणि ट्रक यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा अपघात झाला. ट्रकवर धडकून बस आडवी झाली.
बस पलटल्यानंतर गाडीतील सामानही इतरत्र विखुरलं. तसंच बसच्या खिडक्यांच्या काचांचा चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं.
बसमधील खिडक्यांच्या काचांचा चुराडाही रस्त्यावर पडल्याचं चित्र दिसत होतं
या अपघातात 15 ते 17 विद्यार्थी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने कुठलीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाल्याचं वृत्त नाही
अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी 15 ते 17 विद्यार्थ्यांवर उपचार करण्यात आले.
अपघातानंतर बसला धडक देणाऱ्या ट्रकचा चालक फरार झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरु केला आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातील धामणगाव जवळ महाविद्यालयीन विद्यार्थी प्रवास करणाऱ्या बसला अपघात झाला.