परभणी : कोरोना महामारीमुळे अनेकजणांचे रोजगार गेले होते. सगळ्याच क्षेत्रांना या महामारीचा मोठा फटका बसला. यामध्ये आयटी कंपन्यांना असलेल्या कॅबही वर्क फ्रॉममुळे बंद झाल्या. आता परत एकदा सर्व काही सुरळित होण्याच्या मार्गावर आहे. मात्र यादरम्यान महाराष्ट्रातील एका कॅब ड्रायव्हरने वेगळाचा उद्योग सुरू केला होता. आता त्यांचा भांडाफोड झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
आरोपी विनोद किशनराव मुंडे कॅबमध्ये हा फेसबूकवरून अनोळखी महिलांच्या अकाउंटवर एक लिंक पाठवत होता. या लिंकवर समोरील महिलांनी क्लिक केलं तर त्यांंचं अकाउंट हॅक ह्यायचं. पीडित महिलांच्या अकाउंटचा अॅक्सेस त्याच्याकडे जात होता. त्यानंतर आरोपी तीच लिंक पीडितेच्या मित्रांना-मैत्रिणींना पाठवत होता. मित्राने किंवा मैत्रिणीनेच लिंक शेअर केली म्हणून त्याही ती लिंक ओपन करायच्या.
अशा प्रकारे आरोपी विनोद मुंडे महिलांना आपल्या जाळ्यात ओढत होता. त्यानंतर तो संबंधित महिलांचे फोटो आणि अश्लील व्हिडीओ मॉर्फ करून ते अश्लील वेबसाईटवर अपलोड करण्याची धमकी द्यायचा. जर फोटो अपलोड नसतील होऊ द्यायचे तर ब्लॅकमेल करून त्यांना 5 ते 10 हजार रूपये मागायचा. महिलांचे राहणीमान पाहून त्यांच्या आर्थिक परिस्थितीचा अंदाज बांधत तशा प्रकारे पैशांची मागणी करायचा.
आरोपीला वाटायचं की जास्त पैसे न मागता त्यांना कमी मागायाचे म्हणजे ते फोटो अपलोड होऊ नयेत या भीतीने त्या पोलिसांकडे तक्रार करणार नाहीत. मात्र इथेच तो फसला कारण त्याच्याविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन आणि मुंबईतील एका महिलेने तक्रार केली.
दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करत त्याला लातूरमधून बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने याआधी 24 महिलांना ब्लॅकमेलकरून पैसे उकळल्यांची माहिती समोर आली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.