सांगली : मिरजमधील राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता अभिजित हारगे (Sangeeta Harge) यांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे (Sandhya Awale) यांच्या तक्रारीनुसार राष्ट्रवादीच्याच नगरसेविकेवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून संध्या आवळे यांना शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच संध्या आवळेंना जातिवाचक शिवीगाळ करुन अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचाही दावा केलाी जात आहे. याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका संगीता हारगे या सांगली महापालिकेच्या माजी स्थायी सभापती असून, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अभिजित हारगे यांच्या पत्नी आहेत.
मिरजेतील राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या सांगली जिल्हाध्यक्षा संध्या आवळे यांनी पतीच्या आजारपणामुळे आणि लॉकडाऊनमध्ये पैशाची गरज असल्याने नगरसेविका संगीता हारगे यांच्याकडून 2021 मध्ये 55 हजार रुपये उसनवार घेतले होते. त्या बदल्यात नगरसेविका संगीता हारगे यांनी त्यावर पाच टक्के व्याजाची आकारणी केली, त्यापैकी 39 हजार रुपये रक्कम परत केली असता थोड्या प्रमाणात मुद्दलही जमा केली असल्याचे संध्या आवळे यांनी तक्रारीत सांगितले आहे.
याबाबत नगरसेविका संगीता हारगे यांनी वारंवार अजून 52 रुपये द्यायला लागतील असे सांगून धमकावले, तसेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देणे सुरु केल्याची तक्रार संध्या आवळे यांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात केली आहे. त्याशिवाय थकित रक्कम फेडण्यासाठी जातीवाचक भाषा वापरून अवमानित करत असल्याचेही तक्रारीत सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
82 वर्षांचे शरद पवार कुस्तीच्या आखाड्यात म्हणतात, ‘अजून मी म्हातारा नाही’!
ठाकरे सरकारचे बडे मंत्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या भेटीला, कोणत्या मुद्यावर चर्चा?