आयुष्यातली कोणती संध्याकाळी शेवटची ठरेल, हे कुणीच सांगू शकत नाही. गणेशोत्सवादरम्यान नाचताना एका कलाकाराचा मृत्यू झाला. घटनेचा व्हिडीओ (Hanuman Video Death) जेव्हा समोर आला, तेव्हा सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकलाय. ही घटना मैनपुरीमध्ये (Mainpuri, Uttar Pradesh) घडली. एका मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्यात हनुमानाच्या (Hanuman Death) वेशात एक कलाकार नाचत होता. पण अचानक तो जागेवरच कोसळला. मंदिरातील भाविकांसमोरच काही क्षणांपूर्वी नाचत असलेल्या या कलाकाराला भोवळ आली आणि तो जागेवरच आडवा झाला. यातच या कलाकाराचा मृत्यू झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला.
असंख्य भाविक गणेश मंडपात हजर होते. या लोकांसमोर हनुमानाचा वेश परिधान केलेला कलाकार नाचत होता. जेव्हा तो अचानक सगळ्यांसमोर पडला, तेव्हा लोकांना वाटलं की तो अभिनय करतोय. पण तसं नव्हतं. बराच वेळ त्यानं काहीच हालचाल केली नाही, तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे.
अखेर गणेश मंडपातील लोकांनी या कलाकाराला उचललं. डॉक्टरांकडे नेलं. रुग्णालयात डॉक्टरांनी जेव्हा या व्यक्तीला तपासलं, तेव्हा त्याचा आधीच मृत्यू झालेला होता. डॉक्टरांनी कलाकाराचा मृत्यू झालाय, हे सांगताच, सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकरली. उत्तर प्रदेशच्या मैनपुरीत घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली.
‘जिंदगी की न जाने कौन सी शाम आखिरी हो जाए’
मैनपुरी के बंशीगोहरा में गणेश जी के पंडाल में कलाकार रवि शर्मा हनुमान जी की लीला का मंचन कर रहे थे तभी अचानक ज़मीन पर गिर गए. लोगों ने समझा लीला कर रहे हैं. बाद में उठाकर जिला अस्पताल ले जाने पर डॉक्टरों ने मृत घोषित कर दिया.#Mainpuri pic.twitter.com/MXBwprUVn6— Ujjwal Mishra (News 24) (@UjjwalTv) September 4, 2022
मैनपुरीच्या कोतवाली क्षेत्रात बंशीगौरा परिसरात एक शिवमंदिर आहे. या शिवमंदिरात श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात होता. शनिवारी संध्याकाळी भजन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. असंख्य भाविकही या भजन कार्यक्रमात सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात रवी शर्मा नावाचा एक कलाकार हनुमान बनून नाचत होता. नाचता नाचता तो पुढे चालत गेला. त्याचे पाय थिरकतच होते. पण एका क्षणी तो थांबला. मागे फिरला. शेवटी लाल कपड्यावर येऊन तो खाली बसला आणि तिथेच आडवा झाला. यानंतर रवी शर्मा या कलाकाराच्या शरीराने हालचालच केली नाही. रवी शर्मा याच्या अकाली मृत्यूने त्याच्यासोबतच्या इतर कलाकारांनी दुःख व्यक्त केलंय. तर दोन मिनिटं आधी ज्याला नाचताना पाहिलं, त्याचा मृत्यू झालाय, यावर विश्वास ठेवणं लोकांनाही जड गेलंय.