कल्याण – पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी एकल वापर प्लास्टिकवर बंदी (plastic ban) घालण्यात आली आहे. पण शुक्रवारी रात्री कल्याण-डोंबिवली (KDMC) महापालिका क्षेत्रातील ब प्रभागात पुठ्याने भरलेल्या टेम्पोच्या आत 35 गोण्या म्हणजेचं 2 टन प्लास्टिक नेणारा एक पिकअप टेम्पो (Tempo) पकडण्यात आला. नेमके हे प्लास्टिक कुठून आणले गेले याचा शोध पालिकेचे घनकचरा अधिकारी अतुल पाटील आणि एमपीसीबीचे अधिकारी घेत आहेत.
प्लॅस्टिक वापरण्यास योग्य आहे की नाही याचा तपास सुरू असून हा एकल वापर प्लास्टिक आढळून आल्यास टेम्पो चालक तसेच संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पालिका अधिकारी स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या एकल वापर प्लास्टिक वर न्यायालयाने बंदी घातली आहे. हे प्लास्टिक पर्यावरणीय दृष्ट्या अतिशय धोकादायक असल्याचे अनेक माध्यमातून सिद्ध झाले आहे. इतकेच नव्हे तर या प्लास्टिकमुळे पूर परिस्थिती नियंत्रणात येण्यास अडथळा निर्माण होतो असे देखील अनेक अहवालांमध्ये स्पष्ट झाले आहे.
यानंतर न्यायालयाने यावर बंदी घातली असून महाराष्ट्रातील पालिका प्रशासनाने असे प्लास्टिक बाळगणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई लागू केली आहे. तरी सुध्दा लपून छपून या प्लास्टिकचा वापर अजूनही केला जात असल्याचे स्पष्ट दिसून येते.
शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ग्रस्त घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना खडकपाडा परिसरातून भरलेला टेम्पो जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी हा टेम्पो थांबवत टेम्पो चालकाला या संदर्भात विचारले असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
याचवेळी टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो चेक केल्यास या टेम्पोत बाहेर दाखवण्यासाठी पुठ्ठे भरले दिसून आले व त्याच्या आत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आढळून आले. यावर कारवाई करत पालिकेने 35 गोण्या म्हणजे 2 टन प्लॅस्टिक जप्त केले आहे अशी माहिती पालिका घन कचरा विभाग उपायुक्त अतुल पाटील यांनी दिली.