प्रॉपर्टीचा ‘वासु’देव करणारा ठकसेन पोलीसांच्या ताब्यात, संशयिताला पकडताच मालेगावच्या तक्रारदारांची धावाधाव

| Updated on: Jan 23, 2023 | 1:52 PM

मालेगाव शहरात प्रॉपटीचा नवा घोटाळा समोर आला असून मुख्य संशयिताला पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामध्ये इतर वासू टोळीच्या शोधात पोलीस आहे.

प्रॉपर्टीचा वासुदेव करणारा ठकसेन पोलीसांच्या ताब्यात, संशयिताला पकडताच मालेगावच्या तक्रारदारांची धावाधाव
Image Credit source: Google
Follow us on

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : गेल्या काही दिवसामध्ये मालेगाव शरहरातील खरेदी विक्रीच्या कार्यालयामध्ये प्रॉपर्टी घोटाळ्याची चर्चा होती. मात्र, याबाबत कुठलीही कारवाई होत नव्हती, त्याचे कारण म्हणजे कोणीही तक्रार दाखल करत नव्हते. मात्र, एका तक्रारदाराने तक्रार दाखल करताच मालेगावमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. वासू नावाच्या व्यक्तीने प्रॉपर्टी कार्यालयात घालून ठेवलेला प्रॉपर्टीचा वासूदेव समोर आला आहे. यामध्ये अनेक शासकीय अधिकाऱ्यांचा संशय देखील पोलिसांना सुरू असून लवकरच तपासात याबाबतच्या धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे. वासुदेव शिर्के या व्यक्तीस मालेगाव पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती मिळताच तक्रारदारांची मालेगावच्या छावणी पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. काहींनी खरेदी विक्री कार्यालय गाठत कागदपत्रांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदारांनी प्रॉपर्टी कार्यालयात गोंधळ घातल्याने शासकीय अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

मूळ मालेगाव शहरासह तालुक्यातील रहिवासी मात्र नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर गावी गेलेल्या व्यक्तीकडून पैसे उकळण्याचा गोरखधंदा मालेगावमध्ये समोर आला आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या नावे असलेल्या जमीन, प्लॉट आदींची माहिती मिळवित त्यांना थेट असतील त्याठिकाणी जावून या टोळीकडून गाठले जायचे, जमीन अथवा प्लॉटचे मुळमालक म्हणेल त्या रक्कमेप्रमाणे खरेदी-विक्रीचा व्यवहार या टोळीकडून निश्चित केला जात होता.

हे सुद्धा वाचा

खरेदी-विक्रीची कागदपत्रे तयार करुन मुळ मालकाला दाखविले जात होते. मात्र मुख्य खरेदीच्या प्रक्रियेप्रसंगी येथील संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयात बनावट कागदपत्रांद्वारे शासकीय दराप्रमाणे कमी किंमतीत जमिनी या टोळीकडून नावे केल्या जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

मुळ मालकांना मात्र बनावट धनादेश देवून त्यांची फसवणूक झाली आहे. यात काही नागरिकांनी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेली काही वर्ष या भू-माफियांचा हा गोरखधंदा सुरु होता.

तक्रारदारांची संख्या वाढू लागली असून अनेकांनी पोलिसांना याबाबत अर्ज दिले आहे. मालेगाव शहरतील फसवणूक करणाऱ्या टोळीमुळे मोठं रॅकेट उद्ध्वस्त होणार असून शासकीय अधिकारी देखील यामध्ये अडकण्याची शक्यता आहे.